शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
2
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
3
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
4
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
5
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
6
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
7
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
8
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
9
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
10
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
11
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
12
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
13
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
14
दहावीतही मुलींचा 'स्ट्राइक रेट' जबरदस्त! सीबीएसईतही कन्या 'शक्ती'
15
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण
16
पश्चिम-मध्य रेल्वेच्या नव्या मार्गांच्या कामाला गती; २९.३२ हेक्टरवरची झाडे तोडण्यास परवानगी
17
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
18
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
19
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
20
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य

अमेरिकेत भारतीयाची हत्या

By admin | Updated: February 25, 2017 00:34 IST

कॅनसस शहरात एका अमेरिकी नागरिकाने भारतीय इंजिनीअरची गोळ्या घालून हत्या केल्याने अमेरिकेतील भारतीयांमध्ये खळबळ माजली आहे.

ह्यूस्टन : कॅनसस शहरात एका अमेरिकी नागरिकाने भारतीय इंजिनीअरची गोळ्या घालून हत्या केल्याने अमेरिकेतील भारतीयांमध्ये खळबळ माजली आहे. आमच्या देशातून चालते व्हा ; अतिरेक्यांनो, असे हा हल्लेखोर म्हणत होता, असे सांगण्यात येते शहरात गजबजलेल्या बारमध्ये झालेल्या या घटनेत दोन जण जखमी झाले. आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी सांगितले की, हा वर्णद्वेषाने प्रेरित गुन्हा आहे. गोळीबारात भारतीय इंजिनिअर श्रीनिवास कुचीभोटला (३२) यांचा मृत्यू झाला. ते आॅलेथ स्थित गार्मिन मुख्यालयात कार्यरत होते. माजी नेमबाज एडन पुरिनतोन (५१) याने हा गोळीबार केला. त्याचा आणि या इंजिनीअरचा वर्णद्वेषावरुन वाद झाला होता. या हल्ल्यात अन्य एक भारतीय व त्यांचा सहकारी अलोक मदसानी हे गंभीर जखमी झाले आहेत. जखमी झालेल्यात अमेरिकी नागरिक ईआन ग्रीलट हे आहेत. आॅलेथच्या आॅस्टिन बार अँड ग्रिल येथे ही घटना घडली. पोलिसांनी सांगितले, पुरिनतोन हा वाद झाल्यानंतर येथून निघून गेला होता. पण, तो बंदूक घेऊन परत आला. बारचे सुरक्षारक्षक टीव्हीवर बॉस्केटबॉलची मॅच पाहत होते. आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्यावर खून आणि खूनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानिक पोलीस एफबीआयसोबत या प्रकरणाचा तपास करत आहेत. भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी दु:ख व्यक्त करत सांगितले की, भारतीय दूतावासाच्या दोन अधिकाऱ्यांना तातडीने कॅनसस येथे पाठविण्यात आले आहे. सुषमा स्वराज यांनी ट्विट केले आहे की, गोळीबाराच्या या घटनेचा मला धक्का बसला आहे. अमेरिकेतील भारतीय राजदूत नवतेज सरना यांच्याशी मी चर्चा केली आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी सांगितले, कुचीभोटला आणि मदसानी हे अनुक्रमे हैदराबाद आणि वारंगल येथील रहिवासी आहेत. भारतीय दूतावासाचे अधिकारी जखमींना मदत करतील. तर, या इंजिनिअरचे पार्थिव देशात आणण्यासही मदत केली जाईल. घटनेची आणखी माहिती घेण्यात येत आहे. (वृत्तसंस्था)