शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानला आता विचार करावाच लागेल...; भारत-अमेरिका व्यापार करारानंतर तज्ज्ञांचा थेट इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2026 15:55 IST

US India Trade Deal, Pakistan: भारत-अमेरिका कराराचा पाकिस्तावर काय परिणाम होणार? जाणून घ्या

US India Trade Deal: गेल्या काही दिवसांत जागतिक स्तरावरील राजकारणात अनेक बदल घडले आहेत. भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार करारामुळे दक्षिण आशियातील आर्थिक समीकरणांमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गेल्या आठवड्यामध्ये भारत आणि अमेरिका यांच्यात अंतरिम व्यापार करार झाल्यानंतर पाकिस्तानचे (Pakistan) धाबे दणाणले असल्याचे दिसू लागले आहे. जागतिक राजकीय परिस्थितीचे अभ्यासक आणि तज्ज्ञ यांनी पाकिस्तानच्या सरकारला व्यापार धोरणाबाबत पुनर्विचार करण्याचा स्पष्ट शब्दांत इशारा दिला आहे.

भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार करारानुसार अमेरिकेने भारतावर लादलेले आयात शुल्क २५ टक्क्यांवरून १८ टक्क्यांपर्यंत कमी केले आहे. तसेच रशियाकडून तेल खरेदी केल्यामुळे भारतावर लावण्यात आलेली अतिरिक्त २५ टक्के शुल्कदेखील हटवण्यात आले आहे. याबदल्यात भारताने रशियाकडून तेल आयात थांबवण्याचे आश्वासन दिल्याचे सांगितले जात आहे. या निर्णयामुळे जागतिक व्यापार व्यवस्थेत भारताची भूमिका अधिक भक्कम होण्याची शक्यता आहे.

भारताच्या भूमिकेचे कौतुक

जागतिक व्यापार संघटनेतील पाकिस्तानचे माजी राजदूत डॉ. मन्जूर अहमद यांनी या कराराला भारताच्या पारंपरिक व्यापार धोरणातील मोठा बदल असल्याचे म्हटले आहे. या निर्णयामुळे भारताने बाजार अधिक खुला करण्याचा निर्णय घेतला आहे असे त्यांचे निरीक्षण आहे. तसेच, रशियन तेल आयात थांबवण्याचा करार आणि चीन-अमेरिका व्यापार धोरण या मुद्द्यावरून भारताने घेतलेली भूमिका जागतिक स्तरावरील महत्त्वाचे पाऊल असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.

पाकला दिला सावधनतेचा सल्ला

डॉ. अहमद यांनी पाकिस्तानला या घडामोडींबाबत सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. पाकिस्तानचा सर्वात मोठा निर्यात बाजार अमेरिकाच असल्याने तेथील शुल्क धोरण किंवा बाजारातील प्रवेश नियमांमध्ये बदल झाल्यास, पाकिस्तानच्या वस्त्रोद्योगावर मोठा परिणाम होऊ शकतो, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. याशिवाय पाकिस्तानने अमेरिकेसोबत व्यापक द्विपक्षीय व्यापार करारासाठी गंभीर प्रयत्न केले नाहीत, ही मोठी चूक असल्याची टीकाही त्यांनी केली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : India-US trade deal: Experts warn Pakistan to rethink trade policies.

Web Summary : The India-US trade deal could reshape South Asian economics. Experts warn Pakistan to reconsider trade policy as the deal reduces tariffs and strengthens India's global position. Pakistan needs to carefully watch US trade policies.
टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारतAmericaअमेरिका