शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

India Replay to Pakistan Shahbaz Sharif: शाहबाज शरीफांच्या काश्मीर प्रस्तावाला भारताचा जबरदस्त रिप्लाय; अमेरिकाही आली सोबत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2022 14:27 IST

India-US 2+2 Dialogue: अमेरिका दौऱ्यावर असलेले भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानचे नवनिर्वाचित पंतप्रधान शाहबाज शरीफ यांना शुभेच्छा दिल्या आणि दहशतवादाच्या मुद्द्यावरुन खास संदेशही दिला.

वॉशिंग्टन: पाकिस्तानमध्ये काल नवाज शरीफ यांचे बंधू शाहबाज शरीफ यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली. तत्पूर्वी त्यांनी मोदींना काश्मीरवर चर्चेचा प्रस्ताव देताना आम्ही काश्मीरींना वाऱ्यावर सोडणार नसल्याचे म्हटले. तसेच भारताला पाकने कसे गुडघ्यावर टेकायला भाग पाडलेले, अशी शेखी मिरविली. यावर आता भारताने शरीफ यांना जबरदस्त उत्तर दिले आहे.

शाहबाज शरीफ यांना भारत आणि अमेरिकेने संदेश देताना म्हटले की, पाकिस्तानने आधी दहशतवाद्यांवर तात्काळ आणि कायमची कारवाई करावी, पाकिस्तानाच्या नियंत्रणात असलेल्या कोणत्याही भूभागाचा दहशतवादी हल्ल्यांसाठी वापर केला जाऊ नये, 26/11 आणि पठाणकोट हल्ल्यातील दोषींना न्यायालयाच्या कक्षेत आणण्यात यावे अशी मागणी केली आहे.

राजनाथ सिंह यांचा संदेश

भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. यादरम्यान त्यांनी पाकिस्तानचे नवनिर्वाचित पंतप्रधान शेहबाज शरीफ यांना दहशतवादाच्या मुद्द्यावरुन एक खास संदेश पाठवला आहे. राजनाथ सिंह म्हणाले, "मला पाकिस्तानच्या पंतप्रधानांना एवढेच म्हणायचे आहे की, त्यांनी दहशतवाद संपवण्याच्या दृष्टीने काम करावे. माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत."

2+2 चर्चेत दहशतवादाचा मुद्दा उपस्थित एएनआयशी बोलताना राजनाथ सिंह म्हणाले की, "हे स्पष्ट आहे की जेव्हाही द्विपक्षीय चर्चा होते, तेव्हा दहशतवादाचा मुद्दा उपस्थित केला जातो. अमेरिकेसोबतच्या 2+2 चर्चेदरम्यान आम्ही यावर चर्चा केली. अमेरिकेच्या बाजूने आश्वासनाचा प्रश्नच येत नाही, आम्ही फक्त चर्चा केली आहे."

संरक्षणमंत्र्यांचे आवाहन...यावेळी संरक्षण मंत्र्यांनी अमेरिकन कंपन्यांना भारतात येऊन गुंतवणूक करण्याचे आणि 'मेक इन इंडिया' कार्यक्रमाला पाठिंबा देण्याचे आवाहन केले. राजनाथ सिंह म्हणाले की, आम्ही अमेरिकन कंपन्यांना उत्तर प्रदेश आणि तामिळनाडूमध्ये काम करण्यास आणि त्या क्षेत्रात गुंतवणूक करण्यास सांगितले आहे.

भारत-अमेरिका मोठी संरक्षण भागीदारी महत्त्वाची भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंधांसाठी मोठी संरक्षण भागीदारी महत्त्वाची असल्याचे ते म्हणाले. एक मोठा देश, हिंद महासागराचे केंद्र आणि लोकशाही म्हणून भारताच्या 'ऍक्ट ईस्ट' आणि 'नेबरहुड फर्स्ट' धोरणाच्या विस्तृत हिंद पॅसिफिक आणि हिंदी महासागर क्षेत्रात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. पारंपारिक आणि उदयोन्मुख संरक्षण क्षेत्रात भारत आपली क्षमता दुप्पट करण्यासाठी अमेरिकेसोबत काम करत असल्याचे राजनाथ सिंह म्हणाले. 

टॅग्स :Rajnath Singhराजनाथ सिंहPakistanपाकिस्तानAmericaअमेरिका