शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

भारत, ब्रिटनमध्ये ऐतिहासिक मुक्त व्यापार करार; ९९ टक्के भारतीय वस्तूंच्या निर्यातीवर शुल्क नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2025 05:43 IST

भारत आणि ब्रिटन यांनी गुरुवारी ऐतिहासिक मुक्त व्यापार समझोत्यावर (एफटीए) स्वाक्षऱ्या केल्या. या करारामुळे दोन्ही देशांतील वार्षिक व्यापारात सुमारे ३४ अब्ज डॉलरची वाढ होण्याची अपेक्षा आहे.

लंडन :भारत आणि ब्रिटन यांनी गुरुवारी ऐतिहासिक मुक्त व्यापार समझोत्यावर (एफटीए) स्वाक्षऱ्या केल्या. या करारामुळे दोन्ही देशांतील वार्षिक व्यापारात सुमारे ३४ अब्ज डॉलरची वाढ होण्याची अपेक्षा आहे. या करारामुळे ९९ टक्के भारतीय निर्यातीवरील शुल्क समाप्त होईल तसेच ब्रिटिश व्हिस्की, कार आणि इतर अनेक वस्तूंवरील शुल्कात कपात होईल.पंतप्रधान नरेंद्र मोदी व ब्रिटिश पंतप्रधान केअर स्टार्मर यांच्या उपस्थितीत भारताचे वाणिज्यमंत्री पीयुष गोयल आणि ब्रिटिश वाणिज्यमंत्री जोनाथन रेनॉल्ड यांनी समझोत्यावर स्वाक्षऱ्या केल्या.     यामुळे दोन्ही देशांतील आयात-निर्यांतदारांना मोठा दिलासा मिळणार असल्याने समाधान व्यक्त होत आहे.या भारतीय उद्योगांना होईल लाभ : वस्त्रोद्योग, चामडे, पादत्राणे, रत्ने व आभूषणे

हा दिवस ऐतिहासिक आहे. कित्येक वर्षांच्या कठोर परिश्रमांनंतर हा करार झाला आहे. यामुळे भारतीय तरुण, शेतकरी, मच्छीमार आणि एमएसएमई क्षेत्रास लाभ होईल. तसेच भारतीयांना टिश उत्पादने स्वस्तात उपलब्ध होतील.- नरेंद्र मोदी, पंतप्रधान

भारतासोबत झालेला व्यापार समझोता हा ब्रिटनसाठी एक मोठा विजय आहे. समझोत्याचा दोन्ही देशांना लाभ होईल. लोकांच्या वेतनात वाढ होईल. राहणीमानाचा दर्जा सुधारेल. कामकरी लोकांच्या हातात अधिक पैसा खेळेल. -केअर स्टार्मर, ब्रिटिश पंतप्रधान 

महाराष्ट्राला काय फायदा?भारत-इंग्लंड मुक्त व्यापार करारामुळे महाराष्ट्रातील शेतकरी, कारागीर आणि सेवा क्षेत्राला मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे, असे ट्वीट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.> महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आंबा, द्राक्ष, फणस, बाजरी आणि सेंद्रिय उत्पादनांच्या निर्यातीत वाढ होणार> हळद, काळीमिरी आणि विलायची यांना जागतिक बाजारपेठेत चांगली पोहोच व अधिक नफा मिळणार> निर्यातीवर शून्य कर लावल्यामुळे कोल्हापुरी चामडी पादत्राणे उद्योगाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत प्रोत्साहन, कोल्हापूरसारख्या लघु-मध्यम उद्योग केंद्रांना जागतिक फायदा

टॅग्स :LondonलंडनIndiaभारतbusinessव्यवसाय