शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

भारताचे थायलंडसोबत हृदय, विश्वास, आत्मा आणि अध्यात्माचे नाते - नरेंद्र मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2019 19:58 IST

थायलंड दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बँकॉक येथे स्वासदी मोदी कार्यक्रमातून भारतीय वंशाच्या नागरिकांना संबोधित केले.

बँकॉक -  थायलंड दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बँकॉक येथे स्वासदी मोदी कार्यक्रमातून भारतीय वंशाच्या नागरिकांना संबोधित केले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनीथायलंडसोबतभारताचे असलेले नाते हे  हृदय, विश्वास, आत्मा आणि अध्यात्माचे नाते असल्याचे सांगितले. तसेच आधुनिक काळात भारत आणि थायलंडमधील दळणवळणाच्या सुविधा वाढत आहेत, दोन्ही देशांदरम्यान आठवडाभरात 300 विनामांची ये जा होते, तसेच भारतामधील 18 ठिकाणे थेट थायलंडशी जोडली गेली असल्याचेही मोदींनी सांगितले. यावेळी आपल्या सरकारने केलेली विविध विकासकामे तसेच कलम 370 हटवण्यासाठी उचललेल्या पावलांचाही उल्लेख केला. 

अमेरिकेत झालेल्या हाऊडी मोदी कार्यक्रमाप्रमाणे बँकॉकमध्ये सवास्डी मोदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला संबोधित करताना मोदी म्हणाले की, ''प्राचीन काळातील सुवर्णभूमी असलेल्या थायलंडमध्ये तुम्हा सर्वांसोबत असताना कुठे परदेशात आलो आहे, असे वाटत नाही. हे वातावरण, ही वेशभूषा पाहिल्यावर सर्वत्र आपलेपणाचा भास होतो. तुम्ही केवळ भारतीय वंशाचे आहात म्हणून नव्हे तर थायलंडच्या कणाकणात जनमनात आपलेपणा झळकतो.'' यावेळी थायलंडसोबत असलेल्या उत्तम दळणवळणाचा उल्लेखही मोदींनी केला. दोन्ही देशांदरम्यान आठवडाभरात 300 विनामांची ये जा होते, तसेच भारतामधील 18 ठिकाणे थेट थायलंडशी जोडली गेली असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, सध्या देशातील 130 कोटी नागरिक नवा भारत घडवण्यासाठी प्रयत्नशील आहे. सहा सात वर्षांपूर्वी भारतात जाऊन आलेल्यांनी पुन्हा देशाला भेट देऊन देशात घडत असलेले बदल पाहावेत, असे आवाहन मोदींनी यावेळी केले. यावेळी आपल्या सरकारने पाच वर्षांत केलेली कामे आणि त्याला लोकसभा निवडणुकीत मतदारांनी सरकारला दिलेल्या जनादेशाचाही उल्लेख केला. "यावर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत 60 कोटींहून अधिक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. पुरुषांसोबत महिलांनीही मोठ्या प्रमाणावर मतदान केले. यंदाच्या निवडणुकीत 60 वर्षांनंतर प्रथमच एक अशी घटना घडली. ती म्हणजे पाच वर्षे सरकार चालवल्यानंतर त्याच सरकारल्या आधीच्यापेक्षा मोठा जनादेश मिळाला आहे. 60 वर्षांपूर्वी असे एकदा घडले होते. गेल्या पाच वर्षांत केलेल्या चांगल्या कामामुळेच हा जनादेश मिळाला."असे मोदींनी सांगितले. त्याबरोबरच दहशतवाद आणि कलम 370 चा उल्लेखही मोदींनी केला. दहशत आणि दहशतवादासाठी कारणीभूत ठरलेली गोष्ट हटवण्याचे काम आम्ही केले. कलम 370 हटवण्यासाठी आम्ही पुढाकार घेतला, असे मोदींनी सांगितले. त्यावेळी उपस्थितांनी उभे राहून मोदींना दाद दिली. ही दाद भारतातील प्रत्येक खासदारासाठी शक्ती बनेल, अशा शब्दात मोदींनी आभार मानले.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीThailandथायलंडIndiaभारत