शहरं
Join us  
Trending Stories
1
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
2
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
3
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
4
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
5
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
6
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
7
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
9
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
10
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
11
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
12
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
13
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
14
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
15
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
16
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
17
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
18
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
19
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

भारताने जी ७७ देशांच्या गटातून बाहेर पडावे, संरक्षण सहकार्य आणखी वाढविण्याची भारताला सुवर्णसंधी -अमेरिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2022 06:54 IST

हिंद-प्रशांत महासागर क्षेत्रातील सुरक्षेबाबत दोन्ही देशांनी चांगली कामगिरी केली असून आता संरक्षण सहकार्यातही मोठी वाढ करण्याची सुवर्णसंधी आहे. या गोष्टी भारताने लक्षात घ्याव्यात, असेही अमेरिकेने सांगितले.

वॉशिंग्टन : अलिप्ततावादाची परंपरा असलेल्या व रशियाशी संबंधित अशा जी ७७ देशांच्या गटातून भारताने बाहेर पडावे, असे अमेरिकेने म्हटले आहे. हिंद-प्रशांत महासागर क्षेत्रातील सुरक्षेबाबत दोन्ही देशांनी चांगली कामगिरी केली असून आता संरक्षण सहकार्यातही मोठी वाढ करण्याची सुवर्णसंधी आहे. या गोष्टी भारताने लक्षात घ्याव्यात, असेही अमेरिकेने सांगितले.अमेरिकेच्या परराष्ट्र उपमंत्री वेन्डी शेरमन यांनी अमेरिकी काँग्रेसच्या परराष्ट्र घडामोडीविषयक समितीच्या बैठकीत हे उद्गार काढले. त्या म्हणाल्या की, भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही देश असून त्याच्याशी अमेरिकेचे घनिष्ठ संबंध आहेत. संरक्षण क्षेत्रात अमेरिका-भारतामध्ये उत्तम सहकार्य प्रस्थापित झाले आहे. भारताने जी ७७ गटातून बाहेर पडावे, अशी अमेरिकेची इच्छा आहे.  युक्रेन युद्धामुळे पाश्चिमात्य देशांनी रशियावर अनेक निर्बंध लादले. त्यामुळे रशियाकडून संरक्षण सामग्रीचे सुटे भाग मिळविणे भारताला खूप कठीण जाणार आहे हे अमेरिकेने निदर्शनास आणून दिले आहे.

ब्रिटनचे पंतप्रधान धडकले थेट युक्रेनमध्ये कीव्ह : रशियाविरोधात मोठ्या हिमतीने लढत असलेल्या युक्रेनला पाठिंबा दर्शविण्यासाठी त्या देशात ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन शनिवारी दाखल झाले. त्यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर जेलेन्स्की यांची भेट घेऊन युद्धाबाबत सविस्तर चर्चा केली. तसेच युक्रेनला आणखी लष्करी व आर्थिक मदत ब्रिटनने दिली आहे.अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन काही दिवसांपूर्वी युक्रेनचा शेजारी देश पोलंडच्या दौऱ्यावर गेले होते. पण सुरक्षेच्या कारणापायी ते युक्रेनला गेले नाहीत. युक्रेनला ९ अब्ज ८८ कोटी रुपयांची लष्करी मदत देण्याची घोषणा ब्रिटनचे जॉन्सन यांनी केली होती.दुसऱ्याच दिवशी जॉन्सन युक्रेनमध्ये दाखल झाले. रशियापासून रक्षण करण्यासाठी युक्रेनला ब्रिटन दीर्घकाळ मदत करणार आहे असे जॉन्सन म्हणाले. 

टॅग्स :Joe Bidenज्यो बायडनIndiaभारतUnited Statesअमेरिका