शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

भारताची मोठी दानत! युद्धादरम्यान पॅलेस्टाइनला पाठवली मदत, अन्न-औषधं घेऊन विमान रवाना

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2023 12:13 IST

हमास आणि इस्रायलमध्ये सुरू असलेल्या युद्धादरम्यान जगातील अनेक देशांनी गाझामधील लोकांसाठी मदत सामग्री पाठवण्याचं आवाहन केलं होतं.

हमास आणि इस्रायलमध्ये सुरू असलेल्या युद्धादरम्यान जगातील अनेक देशांनी गाझामधील लोकांसाठी मदत सामग्री पाठवण्याचं आवाहन केलं होतं. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह अल-सिसी यांना फोन करून सीमा उघडण्याचं आवाहन केलं होते, जेणेकरून तेथील लोकांना मदत करता येईल. यानंतर सुमारे २० ट्रक मदत गाझाला पोहोचवण्यात आली आहे. आता भारतानं पॅलेस्टाईनच्या लोकांसाठी मदत पाठवली आहे.भारताने पॅलेस्टाईनमधील लोकांना मानवतेच्या दृष्टीकोनातून मदत पाठवली आहे, असं परराष्ट्र मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे. भारतीय हवाई दलाचे C-17 ग्लोबमास्टर विमान इजिप्तच्या अल-अरिश आंतरराष्ट्रीय विमानतळावर मदत सामग्री घेऊन रवाना झालंय. भारतानं या विमानाद्वारे पॅलेस्टाईनमधील लोकांना सुमारे ६.५ टन वैद्यकीय मदत आणि ३२ टन आपत्ती निवारण साहित्य पाठवलं आहे. जीवन रक्षक औषधं, सर्जिकल वस्तू, तंबू, स्लिपिंग बॅग, ताडपत्री, स्वच्छता सेवा, पाणी शुद्ध करणारी औषधं यासह अनेक वस्तू पाठवण्यात आल्या आहेत.राफा क्रॉसिंगद्वारे मदतगाझा आणि इजिप्तमधील राफा सीमा ओलांडून ही मदत सामग्री पोहोचवली जाईल. इस्रायलनं गाझा पट्टीवर हल्ला केल्यापासून तेथील सामान्य जनजीवन विस्कळीत झालं आहे. तिथे लोकांना अन्न, पाणी, औषध आणि जीवनावश्यक गोष्टींसाठी संघर्ष करावा लागत आहे. मदत सामग्रीचा पहिला ट्रक गेल्या शनिवारी गाझा येथे पोहोचला, त्यानंतर आतापर्यंत सुमारे २० ट्रक तेथे पोहोचले आहेत. हमासनं दिलेल्या माहितीनुसार २० ट्रक मदत सामग्रीसह आले आहेत, ज्यांनी औषधं, वैद्यकीय पुरवठा आणि मर्यादित प्रमाणात अन्न आणल्याचं त्यांनी म्हटलं.

टॅग्स :Israel-Hamas warइस्रायल - हमास युद्धIndiaभारत