शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

टेहळणी करणारे ड्रोन पाडल्याचा पाकचा दावा भारताने फेटाळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2019 01:04 IST

बाघ क्षेत्रामध्ये नियंत्रण रेषेजवळ टेहळणी करणारे भारताचे ड्रोन विमान (क्वाडकॉप्टर) पाडल्याचा पाकिस्तानी लष्कराने केलेला दावा भारताने फेटाळून लावला आहे.

इस्लामाबाद : बाघ क्षेत्रामध्ये नियंत्रण रेषेजवळ टेहळणी करणारे भारताचे ड्रोन विमान (क्वाडकॉप्टर) पाडल्याचा पाकिस्तानी लष्कराने केलेला दावा भारताने फेटाळून लावला आहे.या ड्रोन विमानाचे छायाचित्र पाकिस्तानी लष्कराच्या आंतरदलीय जनसंपर्क विभागाचे महासंचालक मेजर जनरल असिफ गफूर यांनी मंगळवारी टिष्ट्वटरवर झळकवले. त्यांनी म्हटले आहे की, आमच्या हद्दीत भारताच्या जवानांनाच नव्हे, तर त्यांचे ड्रोनही येऊ दिले जाणार नाही.यासंदर्भात भारतीय लष्कराच्या सूत्रांनी सांगितले की, नियंत्रण रेषेवर अशी कोणतीही घटना घडलेली नाही. भारताची चार ड्रोन विमाने गेल्या वर्षात पाडण्यात आली, असा दावाही पाकिस्तानी लष्कराने केला आहे.काश्मीरमधील उरी येथील लष्करी तळावर दहशतवाद्यांनी १८ सप्टेंबर २०१६ रोजी केलेल्या हल्ल्यात १८ जवान शहीद झाले होते. पाकिस्तानच्या पाठिंब्यानेच हा हल्ला झालेला होता. त्यामुळे त्याच महिन्यात २९ सप्टेंबर रोजी भारतीय जवानांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये जाऊन तेथील दहशतवाद्यांच्या तळावर लक्ष्यभेदी हल्ला केला. जशास तसे उत्तर मिळाल्यामुळे पाकिस्तानने त्यावेळी भारताविरुद्ध खूप आकांडतांडव केले होते. (वृत्तसंस्था)दहशतवादी कारवाया सुरूचपाकिस्तानातून भारतात दहशतवाद्यांची घुसखोरी सुरूच राहिली आहे. ते काश्मीरमध्ये घातपाती कारवाया घडवत असतात. पंजाबमध्येही खलिस्तान लिबरेशन फोर्सला हाताशी धरून आयएसआय या गुप्तहेर संघटनेने काही महिन्यांपूर्वी बॉम्बस्फोट घडवून आणला.या राज्यात दहशतवादाला पुन्हा खतपाणी घालण्याचे कारस्थान पाकिस्तानने रचले आहे. सीमेवर त्या देशाचे सैनिक शस्त्रसंधीचे उल्लंघन करून भारतीय लष्करावर वारंवार गोळीबार करीत असतात. अशा स्थितीत टेहळणी करणारे भारतीय ड्रोन पाडल्याचा पाकिस्तानचा दावाही पोकळ आहे, असे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :Pakistanपाकिस्तान