पॅरिस: दसऱ्याच्या मुहूर्तावर शक्तिशाली लढाऊ विमान असलेल्या राफेलमधून संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी उड्डाण केलं आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे जवळपास 35 मिनिटं या विमानातून प्रवास केला असून, लवकरच हे राफेल लढाऊ विमान भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात दाखल होणार आहे. फ्रान्समधल्या बोर्डोक्स येथील विमान तळावर हवाई दल प्रमुखांच्या उपस्थितीत राफेल हस्तांतरणाचा सोहळा पार पडला.संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी फ्रान्सकडून पहिलं राफेल लढाऊ विमान मिळवलं आहे. आता राजनाथ सिंह त्या विमानातून उड्डाण घेतलं आहे. विशेष म्हणजे राफेल विमान सोपवणार असल्याच्या मुहूर्तावरच राजनाथ सिंह म्हणाले, आज दसरा आणि हवाई दलाचा 87वा स्थापना दिवस आहे. त्यामुळे आजच्या दिवसाला विशेष महत्त्व आहे. भारत आणि फ्रान्समधील राजकीय संबंध मजबूत होत आहेत. 36 राफेल लढाऊ विमानांसाठी 2016ला करार केला होता. मला आनंद आहे की, दिलेल्या वेळेतच राफेल विमानांची डिलीव्हरी होत आहे. राफेलमुळे हवाई दलाची ताकद आणखी वाढणार असून, त्याला एक प्रकारची ताकद मिळेल, असा मला विश्वास आहे.
भारतीय हवाई दलाची ताकद वाढली; 'राफेल' शत्रूच्या उरात भरवणार धडकी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2019 20:17 IST