शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

'भारताने कोरोनाच्या लढाईत 150 पेक्षा अधिक देशांना वैद्यकीय मदत केली'

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2020 22:11 IST

कोरोना व्हायरससंदर्भात बोलताना, भारताचा रिकव्हरी रेट सर्वात चांगला असल्याचे मोदींनी म्हटले

ठळक मुद्देकोरोनाच्या लढाईत भारताने 150 पेक्षा अधिक देशांत वैद्यकीय मदत पोहोचवली आहे. भारताने गतीमानता व एकता दाखवत संकटांना तोंड दिल्याचे मोदी म्हटले. आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच संयुक्त राष्ट्रात सुधारणेला वाव असल्याचंही मोदी म्हणाले. 

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संयुक्त राष्ट्र आर्थिक आणि सामाजिक परिषदेत (ECOSOC) संबोधित करताना भारताच्या विकासाचा आलेखच जगासमोर मांडला. यावेळी, केवळ मोदी सरकारच्या कार्यकाळातील विकासकामांचा उल्लेख न करता, जगाच्या विकासात भारताच्या योगदानाबद्दल भाष्य केलं. भारताने कोरोनाच्या लढाईत दिलेलं योगदान, आणि जगभरातील देशांना केलेल्या वैद्यकीय मदतीचा उल्लेख मोदींनी आपल्या भाषणात केला.

कोरोना व्हायरससंदर्भात बोलताना, भारताचा रिकव्हरी रेट सर्वात चांगला असल्याचे मोदींनी म्हटले. कोरोनाची लढाई आम्ही जनआंदोलन केली, त्यामुळे या संकटाचा सामना सर्वांनीच मोठ्या हिंमतीने आणि कष्टाने केला. याचा परिणाम म्हणूनच भारताचा रिकव्हरी रेट जगातील इतर देशांच्या तुलनेत सर्वाधिक असल्याचे मोदींनी सांगितले. 

जगातील विकासात भारताच्या योगदानाचा उल्लेख करताना, भूकंप असो, चक्रीवादळ असो वा इबोलाचे संकट असो किंवा इतर मानवनिर्मित संकट असो. भारताने मोठ्या हिमतीने त्याचा सामना केला आहे. कोरोनाच्या लढाईत भारताने 150 पेक्षा अधिक देशांत वैद्यकीय मदत पोहोचवली आहे. भारताने गतीमानता व एकता दाखवत संकटांना तोंड दिल्याचे मोदी म्हटले. 

आपल्या भाषणात देशातील प्रत्येक नागरिकाला हक्काचा निवारा देण्यात येत असल्याचंही मोदंनी सांगितलं. भारत देश आपल्या 75 व्या स्वातंत्र्यप्राप्त वर्षाचा सोहळा आयोजित करेल, तेव्हा हाऊसिंग फॉर ऑल 2022 कार्यक्रमांतर्गत प्रत्येक भारतीय नागरिकाच्या डोक्यावर छत असेल, असे मोदी म्हणाले. देशातील 6 लाख गावांमध्ये स्वच्छता करुन, आम्ही महात्मा गांधी यांची 150 व्या जयंती साजरी केली. दरम्यान, आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच संयुक्त राष्ट्रात सुधारणेला वाव असल्याचंही मोदी म्हणाले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNarendra Modiनरेंद्र मोदीUnited Statesअमेरिका