शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

‘नाम’ देशांच्या शिखर परिषदेत भारत-पाकिस्तानची खडाजंगी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2019 06:18 IST

पाक दहशतवादाचा केंद्रबिंदू : काश्मीरवरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी

बाकू (अझरबैजान) : अलिप्त राष्ट्र चळवळीच्या (नाम) येथे झालेल्या १८ व्या शिखर परिषदेत भारतपाकिस्तान यांच्यात काश्मीरवरून जोरदार शाब्दिक खडाजंगी झाली. पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष आरीफ अल्वी व भारताचे उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांच्या भाषणांमध्ये काश्मीरवरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या.

परिषदेत आधी भाषण करताना अल्वी यांनी भारताने काश्मीरच्या संदर्भात अलीकडेच उचललेली पावले ‘बेकायदा, अनैतिक व अवैध’ असल्याचा दावा केला. जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा रद्द करण्याची भारताची कृती ‘आजच्या काळात ज्याची अन्य कशाशी तुलना होऊ शकत नाही असा जुलूम’ असल्याचा त्यांनी आरोप केला. काश्मिरी जनता त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी देत असलेल्या लढ्याची दहशतवादाशी सांगड घालण्याच्या भारताच्या प्रयत्नांवर जगात आता कोणी विश्वास ठेवायला तयार नाही, असा दावाही पाकिस्तानच्या राष्ट्राध्यक्षांनी केला.

सीमापार दहशतवादाचा संदर्भ असला तरी आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर खरे तर भारत पाकिस्तानचा थेट नामोल्लेख टाळत असतो. परंतु अल्वी यांच्यानंतर केलेल्या भाषणात उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी पाकिस्तानाचा स्पष्ट उल्लेख करून आपला हा शेजारी देश हल्लीच्या काळातील दहशतवादाचे केंद्रबिंदू झाला असल्याचे ठामपणे नमूद केले.

दहशतवाद हा केवळ आंतरराष्ट्रीय शांततेला व सुरक्षेला असलेला मोठा धोकाच नाही तर तो ‘नाम’ चळवळीच्या सिद्धांतांनाही हरताळ फासणारा आहे, यावर भर देऊन नायडू यांनी पाकिस्तानने शेजारी देशांच्या विरोधात सीमापार दहशतवादाला खेतपाणी घालण्याच्या आपल्या जुनाट धारणाचे अजूनही समर्थन करावे, याविषयी खंद व्यक्त केला. दहशतवादाचा भस्मासूर नेस्तनाबूत करण्याची गरजनायडू असेही म्हणाले की, ‘नाम’ चळवळीतील आपले सर्व देश आपापली विकासाची उद्दिष्टे व आकांक्षांच्या पूर्ततेवर लक्ष केंद्रित करीत असताना पाकिस्ताने आंतरराष्ट्रीय समुदायाचा विश्वास संपादन करण्यासाठी बरेच काही करण्याची गरज आहे. पाकिस्तानने स्वत:च्या, शेजारी देशांच्या व एकूणच जगाच्या भल्यासाठी दहशतवादाला निर्धाराने सोडचिठ्ठी देणे गरजेचे आहे, यावर त्यांनी भर दिला.माहिती तंत्रज्ञानाच्या सर्वदूर प्रसारामुळे दहशतवाद्यांना सायबर हल्ल्यांचीही क्षमता प्राप्त झाली आहे, याकडे लक्ष वेधून उपराष्ट्रपतींनी सांगितले की, दहशतवादी विचार आणि कृतींचे कोणत्याही प्रकारे समर्थन केले जाऊ शकत नाही. दहशतवादाचा हा भस्मासूर नेस्तनाबूत करण्यासाठी त्याविरुद्धचे सर्व आंतरराष्ट्रीय कायदे व यंत्रणा अधिक कडक करून त्यांची नेटाने अंमलबजावणी करणे हाच एकमेव मार्ग आहे.

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तान