India Pakistan tension Latest Video: पाकिस्तानकडून ड्रोन्स आणि मिसाईल हल्ल्यांची तीव्रता वाढल्यानंतर भारतीय लष्कराने पाकिस्तानवर आणखी एक घाव घातला. आंतरराष्ट्रीय सीमेलगत असलेल्या काही पाकिस्तानी लष्कराच्या चौक्या उद्ध्वस्त करण्यात आल्या. त्याचबरोबर ज्या ठिकाणांनी दहशतवाद्यांचे लॉचिंग पॅड्स आहेत, तेही उडवण्यात आले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
पाकिस्तानकडून हवाई हल्ले वाढल्यानंतर भारतीय लष्करानेही जबरदस्त प्रहार सुरू केला आहे. पाकिस्तान ज्या ठिकाणांवरून भारतातील नागरिक वस्त्यांवर आणि लष्करी ठिकाणांना लक्ष्य केले जात आहे. त्यातील काही चौक्या भारतीय लष्कराने उद्ध्वस्त केल्या आहेत.
भारताने दहशतवाद्यांचे लॉचिंग पॅड्स उडवले
भारतीय लष्कराकडून एक व्हिडीओ जारी करण्यात आला आहे. हा व्हिडीओ सीमेपलीकडे असलेल्या दहशतवाद्याचे लॉचिंग पॅड्स उद्ध्वस्त झाल्याचे आहेत.
ज्या ठिकाणावरून भारताविरोधात हल्ले केले जात आहेत. ती ठिकाणे भारतीय लष्कराने टिपली आहेत. पाकिस्तान ज्या ठिकाणावरून दहशतवाद्यांना भारतात पाठवतो, ते ठिकाणही भारताने उडवले आहे.
पाकिस्तान हवाई तळांवर हल्ले
पाकिस्तानने उधमपूर शहरातील हवाई तळाला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर पठाणकोटमध्येही हल्ल्याचा प्रयत्न केला, जो भारतीय लष्कराकडून हाणून पाडण्यात आला. पंजाबमधील ब्रह्मोस मिसाईल स्टोरेज ठिकाणावरही हल्ला केला. पण, हे सगळे हल्ले हवेतच निष्क्रिय करण्यात आले.
त्यानंतर पाकिस्तानने दावा केला की, भारताने ६ बॅलेस्टाइन मिसाईल डागल्या आहेत. यात चार हवाईतळावर मोठे स्फोट झाले आहेत. रावळपिंडीतील नूर खा, चक्रवालमधील मुरीद आणि शोरकोटमधील रफीकी या हवाईतळांना लक्ष्य करण्यात आले.
पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते अहमद शरीफ चौधरी यांनी दावा केला की, 'काही वेळापूर्वी भारताने फायटर जेट्सने हवेतून जमिनीवर मारा करणाऱ्या मिसाईल्स डागल्या आहेत. आता आमच्या उत्तराचे वाट बघा.'