शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 12:16 IST

India-Pakistan News: २०२४ मध्ये भारताने अण्वस्त्र साठा वाढविला आहे.

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानसह जगातील जवळजवळ सर्व नऊ अण्वस्त्रसंपन्न देशांनी २०२४ मध्ये त्यांची अण्वस्त्र अपग्रेड करण्याची प्रक्रिया सुरू ठेवली शिवाय त्यांच्या शस्त्रांचा साठाही वाढवला. जागतिक थिंक टँक स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट (एसआयपीआरआय - सिप्रि)ने एका अहवालात ही माहिती दिली आहे.

सिप्रिने त्यांचा वार्षिक अहवाल ‘सिप्रि इअर बुक २०२५’ प्रसिद्ध केला आहे. यात जागतिक अण्वस्त्र परिस्थिती आणि शस्त्रास्त्र नियंत्रणावर गंभीर चिंता व्यक्त करण्यात आली आहे. अहवालानुसार, भारताने २०२४ मध्ये १७२ अण्वस्त्रांचा साठा केला होता. त्यात वाढ करून २०२५ मध्ये १८० अण्वस्त्रांपर्यंत वाढविला आहे. भारत केवळ आपल्या अण्वस्त्रांचा विस्तार करत नाही, तर कॅनिस्टराइज्ड क्षेपणास्त्रांसारख्या प्रगत वितरण प्रणालींवरही काम करत आहे. यामध्ये अग्नि-प्राइम क्षेपणास्त्र प्रणाली आणि मीर-व्ही (मल्टिपल इंडिपेंडेंटली टार्गेटेबल री-एंट्री व्हेईकल) सक्षम अग्नी-५ प्रणालीचा समावेश आहे.

नऊ देशांकडे तब्बल १२,२४१ अण्वस्त्रस्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूटने एका निवेदनात म्हटले आहे की, अमेरिका, रशिया, ब्रिटन, फ्रान्स, चीन, भारत, पाकिस्तान, डेमोक्रॅटिक पीपल्स रिपब्लिक ऑफ कोरिया (उत्तर कोरिया) आणि इस्रायल या जवळजवळ सर्व नऊ अण्वस्त्रसंपन्न देशांनी २०२४ मध्ये त्यांची अण्वस्त्रे अपग्रेड केली तसेच त्यांच्या शस्त्रांचा साठा वाढविला. जानेवारी २०२५ मध्ये जगभरातील अंदाजे १२,२४१ अण्वस्त्रांपैकी सुमारे ९,६१४ शस्त्रे संभाव्य वापरासाठी लष्करी साठ्यात होती.

चीन दरवर्षी १०० वॉरहेड्स जोडत आहे, २०३५ पर्यंत १५०० वॉरहेड्स जमवणारचीन दरवर्षी सुमारे १०० वॉरहेड्स जोडत आहे. अहवालानुसार, २०३५ पर्यंत चीन १,५०० वॉरहेड्सपर्यंत पोहोचू शकतो. जागतिक स्तरावर १२,२४१ अण्वस्त्रांपैकी ९,६१४ लष्करी साठ्यात आहेत आणि सुमारे ३,९१२ ऑपरेशनल क्षेपणास्त्रे आणि विमानांवर तैनात आहेत, तर उर्वरित मध्यवर्ती साठवणुकीत ठेवण्यात आली आहेत. 

टॅग्स :India vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तानnuclear warअणुयुद्ध