शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

भारत-पाक वाद मिटणार, अमेरिका मध्यस्थी करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2019 14:34 IST

भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाचं वातावरण आहे.

वॉशिंग्टन- भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाचं वातावरण आहे. त्यातच पुलवामा हल्ल्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तान उघडा पडला आहे. रशिया, अमेरिकेसारख्या देशांनीही भारताला पाठिंबा दिला आहे. त्यानंतर भारत आणि पाकिस्तानदरम्यान वाढता तणाव निवळण्यासाठी अमेरिकेनं पुढाकार घेण्याचा निर्णय घेतला आहे. डोनाल्ड ट्रम्प हे दोन्ही देशांमध्ये मध्यस्थी करण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, भारत आणि पाकिस्तानमध्ये असलेलं तणावाचं वातावरण लवकरच संपुष्टात आलं पाहिजे. त्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. मला आशा आहे की दोन्ही देशांमधील तणाव लवकरच निवळेल, अनेक वर्षांपासूनचा असलेला हा वाद लवकर मिटवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचंही डोनाल्ड ट्रम्प म्हणाले आहेत.तत्पूर्वी पाकिस्तानने आपल्या भूमीवरील दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करावेत, अशी रोखठोक भूमिका अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पॉम्पियो यांनी बुधवारी घेतली होती. त्यानंतर, रात्री उशिरा अजित डोवाल यांनी त्यांच्याशी फोनवर चर्चा केल्याचं कळतं. अमेरिका भारताच्या बाजूने ठामपणे उभी राहणं, हे पाकिस्तानला झेपणारं नाही. त्यामुळे हेच ब्रह्मास्त्र वापरण्याचा प्रयत्न भारत करताना दिसतोय. भारताने दहशतवादाविरोधात केलेल्या कारवाईला अनेक मोठ्या देशांनी पाठिंबा दिला आहे. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करा, असा प्रस्ताव अमेरिका, फ्रान्स आणि ब्रिटन या देशांनी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत दिला आहे. त्याला काळ्या यादीत टाकण्याची मागणीही करण्यात आलीय. हे भारतासाठी मोठं यश आहे आणि पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा. वास्तविक, या बड्या देशांची सहानुभूती मिळवण्यासाठी पाकिस्तानची धडपड सुरू आहे. परंतुअमेरिकेसह रशिया, जपान, इस्रायल, ऑस्ट्रेलिया यासारखे बलाढ्य देशांनी भारताला जाहीर पाठिंबा दिला आहे. 

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्प