शहरं
Join us  
Trending Stories
1
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
2
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
3
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
4
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
5
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
6
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
7
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
8
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
9
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
10
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
11
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
12
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
13
ओल्या संकटावर पुन्हा धो-धो प्रहार; मराठवाड्यात २,८८० गावांना तडाखा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रालाही झोडपले
14
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
15
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
16
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
17
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
18
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
19
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
20
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 

एकीकडे भारत, दुसरीकडे इराण; माझ्या जागी दुसरा असता तर त्याला हार्ट अॅटॅक आला असता 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2019 13:58 IST

काश्मीर प्रश्नावरून कुठलाच देश साथ देत नसल्याने पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी आता या प्रश्नावरून सरेंडर केले आहे.

न्यूयॉर्क - काश्मीर प्रश्नावरून कुठलाच देश साथ देत नसल्याने पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी आता या प्रश्नावरून सरेंडर केले आहे. मंगळवारी आयोजित एका पत्रकार परिषदेमध्ये इम्रान खान यांची अगतिकता स्पष्टपणे दिसून आली. आम्ही भारतावर हल्ला करू शकत नाही, अशा शब्दात त्यांनी अगतिकता व्यक्त केली. मी सध्या अत्यंत कठीण काळामधून  एकीकडे भारत आहे तर दुसरीकडे इराण आहे, माझ्या जागी अन्य कुणी असता तर त्याला हार्ट अॅटॅक आला असता, असे इम्रान खान म्हणले.  न्यूयॉर्कमध्ये आयोजित एका कार्यक्रमात इम्रान खान यांना काश्मीरमधील सध्याच्या परिस्थितीबाबत विचारणा करण्यात आली. तसेच चीनमधील उईगर मुस्लिमांच्या परिस्थितीबाबतही विचारणा झाली. यावेळी इम्रान खान यांनी चीनबाबत मौन बाळगले. मात्र पाकिस्तानचे दु:ख जगासमरो मांडण्याचा प्रयत्न केला.  इम्रान खान म्हणाले, ''चीनबाबत बोलायचे झाल्यास त्यांच्याशी आमचे चांगले संबंध आहेत. तसेच काही मुद्द्यांवर बोलायचे झाल्यास आम्ही खासगीत बोलतो. आता जरा तुम्ही विचार करा ज्या व्यक्तीने 13 महिन्यांपूर्वी देशाची सत्ता सांभाळली आहे. त्याचा देश आर्थिक मंदीशी झुंजत आहे. तो कुठे कुठे म्हणून लक्ष देईल. एकीकडे अफगाणिस्तान, इराण आणि सौदी अरेबियाकडे लक्ष द्यायचे आहे. अमेरिका आहेच.आता सीमेवर अफगाणिस्तानसोबत तणाव आहे. अफगाणिस्तानबाबतसुद्धा काही प्रश्न आहेत. तसेच भारताबाबतसुद्धा वाद सुरू आहे.''  ''मला वाटते माझ्यासमोर अजून खूप प्रश्न आहेत. तुम्ही पण हे मान्य कराल. जर तुम्ही माझ्या जागी असता तर काय केले असते. मला माहीत आहे की अशा परिस्थितीत आतापर्यंत तुम्हाला हार्ट अॅटॅक आला असता.'' असे इम्रान खान यांनी पुढे सांगितले.  क्रिकेटच्या मैदानात खेळायला उतरताना 90 हजार प्रेक्षक आपल्याला पाहत असल्याने एक वेगळ्या प्रकारचा दबाव येतो. हा दबाव तुमच्या व्यक्तिमत्त्वाला कणखर बनवतो. या कणखर व्यक्तिमत्त्वामधूनच मला बरेच काही शिकता आले आहे,' असेही इम्रान खान यांनी पुढे सांगितले.  

टॅग्स :Imran Khanइम्रान खानPakistanपाकिस्तानUnited Statesअमेरिका