शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

15 मार्चपर्यंत आपले सैन्य हटवा; मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांची भारताला डेडलाईन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2024 20:52 IST

चीन दौऱ्यावरुन परतल्यानंतर मोहम्मद मुइज्जू यांनी भारताला स्पष्ट शब्दात इशारा दिला आहे.

India-Maldives: गेल्या काही दिवसांपासून सुरू झालेला भारत आणि मालदीवमधला वाद थांबण्याचे नाव घेत नाही. यातच आता मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांनी पुन्हा एकदा भारताला आपले सैन्य मालदीवमधून हटवण्यासाठी इशारा दिला असून, भारताला 15 मार्चपर्यंतची मुदत दिली आहे. विशेष म्हणजे, मुइज्जू शनिवारीच चीन दौऱ्यावरुन परत आले आणि भारताला हा इशारा दिला आहे. चीन दौऱ्यात मुइझू यांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचीही भेट घेतली.

गेल्या अनेक वर्षांपासून भारतीय लष्कराची एक तुकडी मालदीवमध्ये तैनात आहे. मालदीवच्या मागील सरकारच्या विनंतीवरुन ही तुकडी तेथे तैनात करण्यात आली होती. भारतीय लष्कराची ही तुकडी मालदीवच्या लष्कराला सागरी सुरक्षा तसेच आपत्ती निवारण कार्यात मदत करते, परंतु आता मुइझ्झूच्या सरकारने भारतीय लष्कराच्या तुकडीला 15 मार्चपर्यंत मालदीव सोडण्याचे आदेश दिले आहेत.

तुकडीमध्ये 88 सैनिकांचा समावेश मालदीवचे सार्वजनिक धोरण सचिव अब्दुल्ला नाझिम इब्राहिम यांनी म्हटले की, भारतीय सैन्य यापुढे देशात राहू शकत नाहीत. राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू आणि त्यांच्या सरकारचे हे धोरण आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मालदीवमध्ये भारतीय लष्कराचे 88 सैनिक उपस्थित आहेत. मुइज्जू सरकारने सुमारे दोन महिन्यांपूर्वी भारतीय सैन्य मागे घेण्याचे आवाहन केले होते, परंतु आता त्यांनी यासाठी मुदतही निश्चित केली आहे.

मुइज्जू भारताचे विरोधकदोन महिन्यांपूर्वी मुइझ्झू म्हणाले होते की, मालदीवला आपल्या भूमीवर परदेशी सैन्याची उपस्थिती चालणार नाही. मुइझू हे चीनच्या जवळचे मानले जातात आणि त्यांच्या 'इंडिया आऊट' मोहिमेतूनच त्यांना मालदीवमध्ये सत्ता मिळाली आहे. गेल्या वर्षी झालेल्या राष्ट्राध्यक्षपपदाच्या निवडणुकीदरम्यान मुइज्जूने भारतीय सैनिकांना परत पाठवण्याचे आश्वासन जनतेला दिले होते.

टॅग्स :MaldivesमालदीवIndiaभारतInternationalआंतरराष्ट्रीयIndian Armyभारतीय जवानchinaचीन