शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
2
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
3
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
4
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
5
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
6
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
7
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
8
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
9
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
10
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
11
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
12
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
13
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
14
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
15
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
16
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
17
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
18
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
19
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
20
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल

भारताने कोरोनाबळींचा खरा आकडा लपविला; डोनाल्ड ट्रम्प यांचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2020 09:13 IST

कोरोना व्हायरस जेव्हा जगभरात पसरू लागला होता तेव्हा ट्रम्प हे निवडणूक पूर्व प्रचारासाठी भारतात आले होते. अमेरिकेतील भारतीयांची मते मिळविण्यासाठी ट्रम्प यांचा हा दौरा होता.

वॉशिंग्टन  : अमेरिकेत कोरोना व्हायरसच्या संकटात सध्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीचे वारे वेगाने वाहू लागले आहेत. यामध्ये डोनाल्ड ट्रम्प हे काहीही बरळू लागले आहेत. आता तर त्यांनी कोरोना व्हायरसपासून झालेल्या मृत्यूंचा खरा आकडा भारताने लपविल्याचा गंभीर आरोप केला आहे. ट्रम्प यांचे प्रतिस्पर्धी जो बायडन यांनी विचारलेल्या प्रश्नावर ट्रम्प यांनी हे वक्तव्य केले आहे. 

दोन्ही नेत्यांच्या डिबेटवेळी ट्रम्प म्हणाले की, जर आज अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन असते तर अमेरिकेत आज 20 लाख लोक मृत झाले असते. यावर बायडेन यांनी ट्रम्प यांच्यावर पलटवार केला. ट्रम्प यांच्याकडे आताही कोरोना व्हायरसविरोधात लढण्यासाठी कोणताही प्लॅन नाहीय, त्यांनी केवळ वाट पाहिली आहे. त्यांच्याकडे पुरेसा पैसा नाही, ज्याचा उपयोग करून लोकांचे प्राण वाचविले जाऊ शकतील. यावेळी ट्रम्प यांनी भारताला चीन आणि रशियाच्या पंक्तीत बसवत त्या देशांप्रमाणे भारतानेही कोरोना मृतांचा आकडा लपविल्याचा आरोप केला आहे. 

बिडेन यांनी कोरोनावरून ट्रम्प यांना घेरताच ट्रम्प यांनी ती चीनची चूक असल्याचा कांगावा केला. ट्रम्प यांच्या या अजब उत्तरावरून बायडेन यांनी ट्रम्प हे अमेरिकेच्या इतिहासातील आतापर्यंतचे सर्वात वाईट राष्ट्राध्यक्ष असल्याचा आरोप केला. ट्रम्प हे ईस्टरपर्यंत कोरोना संपेल असा दावा करत होते. मास्कच्या दाव्यावरही ट्रम्प यांनी जेव्हा मला गरज भासते तेव्हा मी मास्क घालतो, असे उत्तर दिले. मी बायडेन यांच्यासारखे मास्क घालत नाही. जेव्हाही तुम्ही त्यांना पाहाल ते मास्क लावूनच फिरतात. ते 200 मीटर लांबून बोलतील परंतू ते देखील मास्क घालूनच असा आरोपही ट्रम्प यांनी केला. कोरोनामुळे आम्ही चीनसाठी दरवाजे बंद करावेत असे बायडेन यांना वाटत नव्हते. कारण ते त्यांना खूप भय़ानक वाटत होते. यावर बायडन य़ांनी सांगितले की, कोरोनामुळे लाखो लोक मारले गेले आहेत. आता जर अक्कलहुशारीने आणि वेगाने पाऊले उचलली गेली नाहीत तर आणखी लोक प्राण गमावतील. 

महत्वाचे म्हणजे कोरोना व्हायरस जेव्हा जगभरात पसरू लागला होता तेव्हा ट्रम्प हे निवडणूक पूर्व प्रचारासाठी भारतात आले होते. अमेरिकेतील भारतीयांची मते मिळविण्यासाठी ट्रम्प यांचा हा दौरा होता. यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर भारतात जेव्हा लॉकडाऊनची गरज होती तेव्हा ट्रम्प यांच्यासाठीच्या प्रचारात व्यस्त असल्याचे आरोप होत आहेत. अशावेळी ट्रम्प यांनी भारतावरच गंभीर आरोप केल्याने खळबळ उडाली आहे. 

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पNarendra Modiनरेंद्र मोदीcorona virusकोरोना वायरस बातम्याAmericaअमेरिकाElectionनिवडणूक