शहरं
Join us  
Trending Stories
1
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
2
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
3
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
4
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
5
अनैतिक संबंधांसाठी पत्नीनं सोडली मर्यादा, केला गंभीर गुन्हा, तिला कठोर शिक्षा द्या म्हणत पती झाला भावूक 
6
जयंत पवार पायउतार होताच रोहित पवारांकडे मोठी जबाबदारी; सुप्रिया सुळेंनी केली महत्त्वाची घोषणा
7
इन्स्टावर ओळख, १४००० किमीचा प्रवास करून मुलगी भारतात, पाठोपाठ घरचेही आले अन् सर्वांना बसला धक्का
8
"उद्धवजी, तुम्हाला इकडे यायचा स्कोप, विचार करता येईल"; विधान परिषदेत देवेंद्र फडणवीसांकडून ऑफर
9
शरिया कायद्यातील 'ब्लड मनी' काय आहे? निमिषा प्रियाचा जीव वाचवण्याचा शेवटचा मार्ग
10
BHEL: दहावी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी, बीएचईएलमध्ये भरती सुरू, 'अशी' होणार निवड!
11
हृदयस्पर्शी! १४ वर्षांनी लेकाने पूर्ण केलं वडिलांचं स्वप्न, गिफ्ट केली बुलेट, Video पाहून पाणावले डोळे
12
१४ गावांचा प्रश्न मिटणार, तेलंगणातून महाराष्ट्रात येणार; CM देवेंद्र फडणवीसांनी दिले निर्देश
13
विभान भवनाच्या आवारात गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाडांमध्ये तुफान राडा, शिविगाळ
14
स्टार प्रवाहनंतर तेजश्री प्रधानचा 'झी मराठी'कडे यू-टर्न, यावर सतीश राजवाडे म्हणाले....
15
मालमत्तेवरून वाद विकोपाला, धाकट्या भावाने थोरल्या भावाच्या कुटुंबाच्या अंगावर घातली गाडी, घटना CCTV कॅमेऱ्यात कैद
16
निमिषा प्रिया प्रकरण : फाशी टळली, पण दिलासा नाहीच! अता तलालचा भाऊ म्हणाला, "खून खरीद नहीं सकते, अल्लाह...!"
17
१० वर्षांच्या मुलाने चालवला ट्रक, लोकांचा जीव धोक्यात; Video पाहून चुकेल काळजाचा ठोका
18
“भाजपात संघटन चांगले, शिंदेसेनेत पक्षांतर्गत शिस्त नाही, त्यामुळे...”; हेमंत गोडसे थेट बोलले
19
"मुलींपासून दूर केलं, मला न सांगता..."; गुहेत सापडलेल्या रशियन महिलेच्या पतीने मांडली व्यथा
20
२४० km रेंज अन् स्टायलिश लूक; लॉन्च झाली दमदार EV क्रूझर बाईक, किंमत फक्त सव्वा लाख...

भारताकडून ब्राह्मोस, जपानकडून युद्धनौका, आता तैवानसोबत मिळून चीनला आव्हान देणार हा देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2025 15:44 IST

Philippines News: आशिया खंडामध्ये अनेक देशांचा शेजार लाभलेल्या चीनचे आपल्या एकाही शेजारील देशासोबत चांगले संबंध नाहीत. चीनच्या आक्रमक सीमावादामुळे चीनच्या शेजारी असलेला प्रत्येक देश त्रस्त आहे.  चीनच्या याच आक्रमकतेला वैतागलेल्या फिलिपिन्सचे आता उघडपणे आपल्या धोरणात बदल करण्यास सुरुवात केली आहे.

आशिया खंडामध्ये अनेक देशांचा शेजार लाभलेल्या चीनचे आपल्या एकाही शेजारील देशासोबत चांगले संबंध नाहीत. चीनच्या आक्रमक सीमावादामुळे चीनच्या शेजारी असलेला प्रत्येक देश त्रस्त आहे.  चीनच्या याच आक्रमकतेला वैतागलेल्या फिलिपिन्सचे आता उघडपणे आपल्या धोरणात बदल करण्यास सुरुवात केली आहे. तसेच फिलिपिन्सने आता असं पाऊल उचललं आहे ज्यामुळे चीनची डोकेदुखी वाढली आहे. फिलिपिन्सने भारताकडून ब्राह्मोस क्षेपणास्त्रांची खरेदी केली आहे. त्यानंतर चीनचा कट्टर वैरी असलेल्या तैवानसोबत आपले लष्करी संबंध दृढ केले आहेत. तसेच जपानकडून युद्धनौका खरेदी करून आपल्या नौदलाला भक्कम केलं आहे.

फिलिपिन्स आणि चीनमध्ये बऱ्याच वर्षांपासून सागरी सीमेवरून वाद सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर फिलिपिन्सने चीनच्या आव्हानाचा सामना करण्यासाठी तैवानसोबत मैत्री करण्याचा निर्णय घेतला आहे. फिलिपिन्सचे संरक्षणमंत्री गिल्बर्ट टियोडोरो यांनी सांगितले की, ‘तैवानच्या सुरक्षेचा आमच्यावर काही काही परिणाम होणार नाही असं म्हणणं ही स्वत:चीच फसवणूक ठरेल’. टियोडिरो यांच्या या विधानामुळे फिलिपिन्स तैवानबाबतच्या आपल्या भूमिकेमध्ये बदल करत असल्याचे स्पष्ट होत आहे. मात्र चीनच्या वन चायना पॉलिसीनुसार फिलिपिन्स अजूनही चीनलाच पाठिंबा देत आहे.

दरम्यान, तायपै टाइम्समधील वृत्तानुसार फिलिपिन्सकडून तैवानसोबतचं संरक्षण सहकार्य सार्वजनिकरीत्या दर्शवण्यात येत असलेल्या पातळीपासून खूप पुढे गेलेलं आहे. राष्ट्रपती फर्डिनांड मार्कोस ज्युनियर यांच्या नव्या धोरणांनुसार तैवानसोबतच्या लष्करी आणि अकादमिक संबंधांवर लावण्यात आलेले जुने निर्बंध शिथिल केले आहेत. या वर्षाच्या सुरुवातीला फिलिपिन्सच्या संरक्षण संस्थांशी संबधित असलेल्या तज्ज्ञांनी तैवानच्या वरिष्ठ जनरल्ससोबतच्या रणनीतिक विचारविनिमयामध्ये सहभाग घेतला होता. त्याशिवाय फिलिपिन्स आणि तैवानच्या कोस्ट गार्डने संयुक्त गस्तही घातली होती. हल्लीच तैवानने अमेरिका, जपान आणि फिलिपिन्सच्या त्रिपक्षीय लष्करी सरावामध्ये आपल्या निरीक्षकांना पाठवले होते. ही रणनीती चीनकडून समुद्रामध्ये होत असलेल्या आक्रमक कारवायांना दिलेलं प्रत्युत्तर होती, असे अभ्यासकांचे म्हणणे आहे.  दरम्यान, जपान फिलिपिन्सला सहा जहाजं देणार आहे. याबरोबरच अबुकुमा श्रेणीमधील एक युद्धनौका जपान फिलिपिन्सला देण्याच्या तयारीत आहे. 

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीयchinaचीनJapanजपानIndiaभारत