शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

भारताला मिळाली रशिया-ब्राझीलची साथ; चीनही पाठिंबा देणार, ट्रम्पविरोधात ब्रिक्स देशांची वज्रमुठ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2025 11:56 IST

डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात ब्रिक्स देश एकत्र येत आहेत.

Donald Trump: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतासह जगभरातील अनेक देशांवर आयात शुल्क लावले आहे. कालच त्यांनी भारतावर अतिरिक्त २५% शुल्क लावण्याची घोषणा केली. यासह भारतावर एकूण ५०% शुल्क लावण्यात आले आहे. अमेरिकेच्या दबावापुढे भारत झुकेल, असे त्यांना वाटले, मात्र भारताने आता नवी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. भारतासाठी अमेरिका एक प्रमुख बाजारपेठ आहे, मात्र या अतिरिक्त शुल्कामुळे भारताने आता इतर पर्याय शोधण्यास सुरुवात केली आहे. 

टॅरिफ धोरणांमुळे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प स्वतः अडचणीत सापडल्याचे पाहायला मिळत आहे. भारतासोबतचे संबंध बिघडवल्याबद्दल त्यांच्यावर फक्त अमेरिकेतूनच नाही, इतर देशही टीका करत आहेत. अशातच, ट्रम्प यांनी भारतावर कर लावल्यानंतर भारताने चीनसोबतचे संबंध सुधारण्यास सुरुवात केली आहे. यासाठी पीएम मोदी स्वतः चीनच्या दौऱ्यावर जाणार आहेत. रशिया आधीपासूनच भारताच्या बाजूने उभा आहे, आता ब्राझीलदेखील भारताच्या बाजूने येतोय. हे चार देश एकत्र आले, तर अमेरिकेच्या वर्चस्वाला नक्कीच एक मोठा धक्का बसेल.

डोभाल यांचा मॉस्को दौराभारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) अजित डोवाल बुधवारी रशिया दौऱ्यावर गेले. डोवाल द्विपक्षीय ऊर्जा आणि संरक्षण संबंध तसेच रशियन कच्च्या तेलावरील पाश्चात्य निर्बंधांवर रशियन अधिकाऱ्यांशी चर्चा करतील. डोवाल यांचा दौरा अशा वेळी होत आहे, जेव्हा पाश्चात्य देशांनी निर्बंध लादले असले तरी, भारत सातत्याने रशियाकडून कच्चे तेल खरेदी करुन अमेरिकेच्या वर्चस्वाला आव्हान देत आहेत. डोवाल यांच्या दौऱ्यापूर्वी रशियाचे उपसंरक्षणमंत्री कर्नल जनरल अलेक्झांडर फोमिन यांनी भारतीय राजदूत विनय कुमार यांची भेट घेतली होती. 

ब्राझीलचे अध्यक्ष पंतप्रधान मोदींशी चर्चा करणारब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांनीही डोनाल्ड ट्रम्प धक्का दिला आहे. अध्यक्ष लुईझ इनासियो लुला दा सिल्वा यांनी ट्रम्प यांच्या टॅरिफवर म्हटले की, ब्राझील जागतिक व्यापार संघटनेसह (डब्ल्यूटीओ) सर्व उपलब्ध संसाधनांचा वापर करून त्यांचे हित जपेल. ते ट्रम्प यांना टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावणार नाहीत, कारण अमेरिकन नेते बोलू इच्छित नाहीत. परंतु ते चीनचे प्रमुख शी जिनपिंग आणि पंतप्रधान मोदींशी फोनवर चर्चा करणार आहेत. अशाप्रकारे ब्रिक्सचा भाग असलेले भारत, चीन, रशिया आणि ब्राझील अमेरिकेच्या वर्चस्वाला आव्हान देण्यासाठी एकत्र येत आहेत.

 

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पNarendra Modiनरेंद्र मोदीAmericaअमेरिकाIndiaभारतrussiaरशियाchinaचीन