शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
2
"कुराणची शपथ घेऊन सांगतो, भाजप...!" मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा मोठा दावा, राजकारण तापलं
3
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
4
परराज्यातील मुलांना एमबीबीएसला प्रवेश घेण्याची मुभा द्या, पालघरच्या कॉलेजने घेतली उच्च न्यायालयात धाव
5
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
6
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
7
एक दिवस CM बनवलं तर काय कराल? अमृता फडणवीस म्हणाल्या- "मी देवेंद्रजींना..."
8
१२ वर्षांनी शतांक गजकेसरी योग: ८ राशींना लॉटरी, इच्छापूर्ती; नवीन नोकरी, अकल्पनीय पैसा-लाभ!
9
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
10
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
11
मराठी अभिनेता दुसऱ्यांदा होणार बाबा, पार पडलं पत्नीचं बेबी शॉवर; अरुण गवळीच्या मुलीसोबत थाटलाय संसार
12
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."
13
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
14
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
15
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
16
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
17
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
18
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
19
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
20
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज

कोरोना काळात केलेली व्हॅक्सीनची मदत; 'हा' देश PM मोदींचा सर्वोच्च पुरस्काराने करणार सन्मान

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2024 14:46 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींना मिळालेल्या सन्मानांच्या यादीत लवकरच आणखी एका सन्मानाची भर पडणार आहे.

PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींना मिळालेल्या सन्मानांच्या यादीत लवकरच आणखी एका सन्मानाची भर पडणार आहे. कॅरेबियन देश डॉमिनिकाने पंतप्रधान मोदींना आपल्या देशाचा सर्वोच्च सन्मान देण्याची घोषणा केली आहे. या सन्मानाची घोषणा करताना डॉमिनिका सरकारने म्हटले की, पीएम मोदींनी कोरोना(Covid 19) महामारीच्या काळात डॉमिनिकाला खूप मदत केली होती. त्या मदतीची परतफेड म्हणून डोमिनिका पीएम मोदींचा सर्वोच्च पुरस्काराने सन्मान करत आहे. 

19 ते 21 नोव्हेंबर या कालावधीत जॉर्जटाउन, गयाना येथे होणाऱ्या इंडिया-कॅरिकॉम समिटमध्ये डॉमिनिकाच्या अध्यक्षा सिल्व्हानी बर्टन यांच्या हस्ते पंतप्रधान मोदींना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. विशेष बाब म्हणजे, फेब्रुवारी 2021 मध्ये पंतप्रधान मोदींनी कोरोना महामारीच्या काळात AstraZeneca Covid-19 लसीचे 70 हजार डोस डॉमिनिकाला पाठवले होते. यामुळे डॉमिनिकामधील हजारो नागरिकांचा जीव वाचलाच, पण त्यांना आपल्या शेजारील देशांनाही मदत करता आली. 

'पंतप्रधान मोदी खरे मित्र' या सन्मानाची घोषणा करताना डॉमिनिका सरकार म्हणाले की, हा पुरस्कार पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली आरोग्यसेवा, शिक्षण आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात डॉमिनिकाला भारताने दिलेल्या पाठिंबा दर्शवतो. पंतप्रधान मोदी हे डॉमिनिकाचे खरे मित्र आहेत. आमच्या गरजेच्या वेळी, विशेषत: जागतिक आरोग्य संकटाच्या वेळी त्यांच्या पाठिंब्याबद्दल आम्ही कृतज्ञता व्यक्त करतो.

पंतप्रधान शिखर परिषदेत भाग घेणारहा पुरस्कारा स्वीकारताना पीएम मोदींनी हवामान बदल आणि भू-राजकीय संघर्षांसारख्या जागतिक आव्हानांचा सामना करण्यासाठी सहकार्याच्या महत्त्वावर भर दिला आहे. डॉमिनिका आणि कॅरिबियन देशांसोबत एकत्र काम करण्याच्या भारताच्या वचनबद्धतेबद्दल त्यांनी सांगितले. डॉमिनिकाच्या अध्यक्षा सिल्व्हानी बर्टन आणि पंतप्रधान रुझवेल्ट स्केरिट भारत-CARICOM शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत. भारत आणि CARICOM सदस्य देशांमधील सहकार्यासाठी सामायिक प्राधान्यक्रम आणि नवीन संधी यावर चर्चा करण्याचे हे व्यासपीठ आहे.

पंतप्रधान मोदींना आतापर्यंत हे सन्मान मिळाले >पापुआ न्यू गिनीने पंतप्रधान मोदींना मे 2023 मध्ये त्यांचा सर्वोच्च 'ग्रँड कंपेनियन ऑफ द ऑर्डर ऑफ लोगोहू' पुरस्कार दिला होता. > फ्रान्सनेही 13 जुलै 2023 रोजी पंतप्रधान मोदींना आपला सर्वोच्च सन्मान 'ग्रँड क्रॉस ऑफ द लीजन ऑफ ऑनर' देऊन सन्मानित केले.> पीएम मोदींना 25 ऑगस्ट 2023 रोजी ग्रीसकडून 'द ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ ऑनर' मिळाला.> तसेच, पीएम मोदींना 2019 मध्ये बहरीनच्या राजाने 'किंग हमाद ऑर्डर ऑफ द रेनेसान्स' सन्मान दिला होता. याशिवाय पीएम मोदींचा अनेक देशांनी सन्मान केला आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीCorona vaccineकोरोनाची लस