शहरं
Join us  
Trending Stories
1
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
2
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
3
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
4
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
5
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
6
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
7
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
8
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
9
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
10
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
11
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
12
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
13
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
14
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
15
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
16
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
17
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
18
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
19
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
20
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
Daily Top 2Weekly Top 5

"...तर पाकिस्तान हल्ला करेल!"; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची भारताला पोकळ धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2025 15:14 IST

पहलगाम हल्ल्यानंतर, भारत-पाकिस्तान यांच्यातील तणाव शिगेला पोहोचला असतानाच ख्वाजा आसिफ यांचे हे विधान आले आहे...

भारताने सिंधू नदीवर धरण बांधले तर पाकिस्तान त्यावर हल्ला करेल, अशी पोकळ धमकी पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी दिली आहे. एवढेच नाही तर, एका टीव्हीला मुलाखत देताना, आक्रमकता केवळ गोळ्यांद्वारे नसते, तर पाणी अडवणे हा देखील हल्लाच आहे, असेही आसिफ यांनी म्हटले आहे. 

पहलगाम हल्ल्यानंतर, भारत-पाकिस्तान यांच्यातील तणाव शिगेला पोहोचला असतानाच ख्वाजा आसिफ यांचे हे विधान आले आहे. १९६० मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात जागतिक बँकेच्या मध्यस्थीने झालेला आयडब्ल्यूटी (सिंधू पाणी करार) हा आजपर्यंतचा जगातील सर्वात यशस्वी जल करार मानला जातो. या करारानुसार, भारताला पूर्वेकडील नद्यांवर (रावी, बियास, सतलज) नियंत्रण देण्यात आले, तर पाकिस्तानला पश्चिमेकडील नद्यांवर (सिंधू, झेलम, चिनाब) अधिक अधिकार मिळाला.

भारताल आंतरराष्ट्रीय पातळीवर अपेक्षित समर्थन मिळालेले नाही, असे पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांना वाटते. भारताचे आरोप आंतरराष्ट्रीय पातळीवर फेटाळण्यात आले असल्याचा त्यांचा दावा आहे. तसेच, मोदी सरकारकडे आपले दावे सिद्ध करण्यासाठी कसलेही पुरावे नाहीत, असेही आसिफ यांनी म्हटले आहे. 

भारत शस्त्राप्रमाणे करतोय पाण्याचा वापर -तत्पूर्वी, भारत पाण्याचा वापर शस्त्राप्रमाणे करत आहे. मात्र आम्हाला भारतासोबत युद्ध करायचे नाही. जर युद्धाची स्थिती निर्माण झालीच, तर पाकिस्तानही प्रत्युत्तर देईल. तसेच सिंधू पाणी करारासंदर्भात पाकिस्तान जागतिक बँकेचा दरवाजा ठोठावेल, असेही ख्वाजा आसिफ यांनी म्हटले होते.

पहलगाम हल्ल्यानंतर भारताची कठोर भूमिका -पहलगाममध्ये २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ जणांच्या मृत्यू झाला होता. यानंतर, भारताने पाकिस्तानविरुद्ध कठोर कारवाई केली आहे. आयडब्ल्यूटी रद्द करण्यासोबतच, भारताने पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा देखील रद्द केले आहेत आणि वाघा-अटारी सीमाही बंद केली आहे.

 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारतwarयुद्ध