शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

‘भारताने इस्लामिक देशांसमोर झुकण्याची गरज नाही’, बड्या देशातून उठला पाठिंब्याचा सूर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2022 15:38 IST

Nupur Sharma Issue: भाजपातून निलंबित करण्यात आलेल्या नुपूर शर्मा यांच्या विधानाचा निषेध करत अनेक इस्लामिक देशांनी भारताकडे माफीची मागणी केली आहे. दरम्यान, इस्लामिक देशांकडून टीका होत असताना नेदरलँडमधील एका खासदारांनी भारताच्या समर्थनार्थ केलेले विधान सध्या चर्चेत आले आहे.

अॅम्स्टरडॅम -  मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत नुपूर शर्मा यांनी केलेल्या वक्तव्यावरून इस्लामिक देशांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. सध्या भाजपातून निलंबित करण्यात आलेल्या नुपूर शर्मा यांच्या विधानाचा निषेध करत अनेक इस्लामिक देशांनी भारताकडे माफीची मागणी केली आहे. दरम्यान, इस्लामिक देशांकडून टीका होत असताना नेदरलँडमधील एका खासदारांनी भारताच्या समर्थनार्थ केलेले विधान सध्या चर्चेत आले आहे. नेदरलँडमधील खासदार आणि पार्टी फॉर फ्रीडमचे अध्यक्ष गीर्ट विल्डर्स यांनी एकापाठोपाठ एक ट्विट करत विल्डर्स म्हणाले की, अरब आणि इस्लामिक देश भारतीय नेत्याच्या एका विधानावर एवढी प्रतिक्रिया देत आहेत, ही बाब हास्यास्पद आहे. या प्रकरणात भारताला माफी मागण्याची काहीही गरज नाही.

ते म्हणाले की, भारताने इस्लामिक देशांच्या प्रतिक्रियेकडे दुर्लक्ष केले पाहिजे. लांगुलचालनाचा काहीही फायदा होत नाही. त्यामुळे परिस्थिती अधिकच वाईट होऊन जाते. त्यामुळे भारतातील माझ्या मित्रांनी इस्लामिक देशांना घाबरू नये. स्वातंत्र्यासाठी उभे राहावे.खासदार गीर्ट विल्डर्स हे नेदरलँड्समधील उजव्या विचारसरणीचे नेते आहे. ते म्हणाले मोहम्मद पैगंबर यांच्या नावावर मला दररोज मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. धमकदी दिल्याने काहीही साध्य होणार नाही. मी सत्य बोलणं बंद करणार नाही.

नुपूर शर्मा यांनी एका टीव्ही शोमध्ये केलेल्या विधानावरून या सगळ्या वादाला तोंड फुटले होते. त्यानंतर भाजपाने नुपूर शर्मा आणि दिल्लीतील मीडियाप्रमुख नवीन कुमार जिंदल यांच्यावर कारवाई केली होती. नुपुरू शर्मांच्या त्या विधानावर अनेक इस्लामिक देशांनी आक्षेप घेतलेला आहे. त्यामध्ये इराण, इराक, कुवेत, कतार, सौदी अरेबिया, ओमान, यूएई, जॉर्डन, अफगाणिस्तान, बहरीन, मालदीव, लिबिया आणि इंडोनेशिया या देशांचा समावेश आहे. तसेच इस्लामिक देशांची संघटना असलेल्या ओआयसीनेही या या विधानावर आक्षेप घेतला होता.  

टॅग्स :IndiaभारतIslamइस्लामInternationalआंतरराष्ट्रीयPoliticsराजकारण