शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

भारत अन् चीनला विकसनशील देशांचे लाभ नको- ट्रम्प

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2019 16:05 IST

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि चीनला विकसनशील देशांसारख्या मिळणाऱ्या लाभावर टीका केली आहे.

वॉशिंग्टनः अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि चीनला विकसनशील देशांसारख्या मिळणाऱ्या लाभावर टीका केली आहे. जागतिक व्यापार संस्थे(डब्ल्यूटीओ)ला विकसनशील देशांची नवी व्याख्या करण्याची आवश्यकता आहे. भारत आणि चीन या आशियातील मोठ्या अर्थव्यवस्था झाल्या आहेत. त्यामुळे त्यांना विकसनशील देशांप्रमाणे लाभ देणं थांबवलं पाहिजे. या दोन्ही देशांना WTOमधून मिळणारे फायदे तात्काळ बंद करायला हवेत.ट्रम्प अमेरिकेच्या उत्पादनांवर लावलेल्या आयात करामुळे भारतावर नेहमीच टीका करत असतात. तर दुसरीकडे अमेरिका आणि चीनमध्ये व्यापार युद्ध भडकले आहे. ट्रम्प यांनी चिनी वस्तूंवर दंडात्मक कर आकारल्यानंतर चीननंही ट्रम्प यांना त्याच भाषेत उत्तर दिलं आहे. कोणत्या देशाला कशा प्रकारे विकसनशील देशाचा दर्जा मिळतो हे WTOनं स्पष्ट करावं, असंही जुलैमध्ये ट्रम्प यांनी सांगितलं होतं. चीन, तुर्कस्थान आणि भारतासारख्या देशांना मिळणारे लाभ बंद करण्याच्या उद्देशानंच ट्रम्प यांनी हे पाऊल उचललं आहे. तसेच कोणतीही विकसित अर्थव्यवस्था WTOतून फायदा मिळवत असल्यास त्या देशावर दंडात्मक कारवाई करावी, असे अधिकारही ट्रम्प यांनी अमेरिकी व्यापार प्रतिनिधीं(यूएसटीआर) ना बहाल केले आहेत.पेनसिल्व्हेनियामध्ये एका सभेला संबोधित करताना ट्रम्प म्हणाले, भारत आणि चीन या आशियातल्या दोन सर्वात मोठ्या अर्थव्यवस्था आहेत. ते आता विकसनशील देश राहिलेले नाहीत. त्यामुळे त्यांना डब्लूटीओचे लाभ मिळू नये. तरीही ते विकसनशील देशांना मिळणाऱ्या सवलतींचा फायदा उठवत आहेत. त्यामुळे अमेरिकेला नुकसान पोहोचत आहे. डब्ल्यूटीओ अमेरिकेबरोबर निष्पक्षरीत्या व्यवहार करणार आहे. गेल्या काही दिवसांपासून अमेरिका आणि चीनमध्ये व्यापार युद्ध छेडलं गेलं आहे. अमेरिकेनं चीनच्या उत्पादनांवर मोठ्या प्रमाणात आयातशुल्क आकारण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे दोन्ही देशांमधले संबंध तणावपूर्ण झाले आहे.  

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पchinaचीनIndiaभारत