शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

India China Faceoff: ...म्हणून चीनच्या मृत सैनिकांचे कुटुंबीय शी जिनपिंगवर भडकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2020 07:03 IST

आता सांत्वन करून या नातेवाईकांना शांत करण्याचा प्रयत्न चीन सरकारने चालविला आहे.

बीजिंग : पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यामध्ये भारतीय लष्कराने दिलेल्या चोख प्रत्युत्तरात चीनचे जे ४०पेक्षा अधिक सैनिक ठार झाले, त्यांच्या पार्थिवाचा उचित आदर न राखल्याने आणि त्यांच्या मृत्यूची वेळेत माहिती न दिल्याने सैनिकांचे कुटुंबीय संतप्त झाले आहेत. आता सांत्वन करून या नातेवाईकांना शांत करण्याचा प्रयत्न चीन सरकारने चालविला आहे.चीनच्या कम्युनिस्ट पक्षाचे मुखपत्र असलेल्या ग्लोबल टाइम्स या वृत्तपत्राचे संपादक हु शिजिन यांनी सांगितले की, वीरमरण आलेल्या सैनिकांविषयी लष्करासहित सर्वांच्याच मनात अतिशय आदर आहे. त्या सैनिकांना आदरांजली वाहण्यात आली आहे. त्याची माहिती योग्य वेळी चिनी जनतेला दिली जाईल. असे सांगून या वृत्तपत्राने चीन सरकारची बाजू सावरण्याचा प्रयत्न केला. गलवान खोºयातील संघर्षात शहीद झालेल्या भारतीय जवानांवर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले होते. मात्र चीनने त्यांच्या पीपल्स लिबरेशन आर्मीचे जे सैनिक ठार झाले, त्यांचा उचित आदर राखला नाही, त्यांची नावेही जाहीर केली नाहीत असा आरोप या सैनिकांच्या नातेवाईकांनी केला होता. त्याची व्हिडीओफितही समाजमाध्यमांवर झळकली होती. त्यानंतर दोन दिवसांनी याच विषयावर ग्लोबल टाइम्स या वृत्तपत्राने संपादकीय लिहिले आहे.भारतीय जवानांबरोबर गलवान खोºयात झालेल्या संघर्षात चीनचे २० पेक्षा कमी सैनिक ठार झाले आहेत असा उल्लेख या संपादकीयात करण्यात आला आहे. मात्र मृतांचा नेमका आकडा किती याविषयी चीनच्या सरकारने मौन बाळगले आहे. >मृतांचा आकडा गुलदस्त्यातचग्लोबल टाइम्स या वृत्तपत्राचे संपादक हु शिजिन यांनी संपादकीयात म्हटले आहे की, दोन्ही देशांतील जनमत बिथरू नये यासाठी चीनने गलवान संघर्षातील मृत सैनिकांचा आकडा जाहीर केलेला नाही. या संघर्षात भारतीय जवानांनी चीनच्या ४०पेक्षा जास्त सैनिकांना ठार केले आहेत तसेच भारताने १६ सैनिकांचे मृतदेह चीनच्या हवाली केले अशा बातम्या पसरल्या होत्या. पण या निव्वळ अफवा आहेत. त्यावर विश्वास ठेवू नका असे आवाहनही या संपादकीयात करण्यात आले आहे.

टॅग्स :chinaचीन