शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

India China Face Off: आशियात चीनची अरेरावी चालणार नाही; अमेरिका, फ्रान्सकडून भारताची पाठराखण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2020 06:41 IST

नरेंद्र मोदी सरकारच्या सहा वर्षांच्या काळातील राजनैतिक धोरण यशस्वी

नवी दिल्ली : चीनविरोधातफ्रान्स व अमेरिकेने भारताची बाजू घेतल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या गेल्या सहा वर्षांच्या काळातील राजनैतिक धोरण यशस्वी होताना दिसते आहे. मोदी सरकारच्या काळात प्रजासत्ताक दिनी फ्रान्सचे तत्कालीन अध्यक्ष होलांद, अमिरेकेचे तत्कालिन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते हे विशेष. तर अमेरिकेचे विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप अलीकडेच भारतात आले होते. त्यामुळे या दोन्ही देशांची भारताशी जवळीक वाढली होती.पॅरीसवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत फ्रान्ससमवेत उभा राहिला होता. २०१६ साली प्रजासत्ताक दिन सोहळ्याचे प्रमुख अतिथी फ्रान्सचे तत्कालिन राष्ट्राध्यक्ष ओलांद होते. गलवान खोऱ्यातील झटापटीनंतर चीनचे पितळ उघडे पडल्याने आंतरराष्ट्रीय समुदायातून फ्रान्स व अमेरिका या दोन्ही बलाढ्य राष्ट्रांची साथ भारताला मिळाली. फ्रान्सचे भारतातील राजदूत इम्यूनल लेनेन यांनी तर अमेरिकेचे परराष्ट्र सचिव (मंत्री) माईक पाँपो यांनी भारताच्या बाजूने विधान करून चीनला समर्थन देणाºया राष्ट्रांना कठोर संदेश दिला आहे. मात्र भारताला श्रीलंका, बांगलादेश या मित्र राष्ट्रांकडून अद्याप सकरात्मक प्रतिसाद मिळालेला नाही. नेपाळ व पाकिस्तानने सरळ भारतविरोधी भूमिका घेतली आहे.इम्यूनल लेनेन यांनी भारतीय शहीदांविषयी सहवेदना प्रकट केली. कर्तव्य बजावताना प्राणार्पण करणाºया सैनिकांच्या कुटुंबियांचे व भारतीयांचे सांत्वन अशी भावना लेनिन यांनी व्यक्त केली. अमेरिकादेखील भारताच्या बाजूनेच उभा राहिला आहे. चीनसमवेत झालेल्या झटापटीत मृत्यू झालेल्यांप्रती आम्ही सहवेदना व्यक्त करतो, असे ट्विट माईक पाँपो यांनी केले. गुरूवारी पाँपो व चीनचे राजनायिक यांग जिएची यांची चर्चा झाली. त्यानंतर लगेचच शुक्रवारी पाँपो यांनी भारतीय जवानांप्रती आदर व्यक्त केला. आशिया खंडात चीनची अरेरावी चालणार नाही, असा अप्रत्यक्ष संदेशच अमेरिके ने दिल्याचा दावा परराष्ट्र मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी केला.बलिदान कधीही विसरता येणार नाहीअमेरिकेचे भारतातील राजदूत केनेथ जस्टर यांनी ' भारतीय जवानांचे शौर्य व बलिदान कधीही विसरता येणार नाही' अशी भावना व्यक्त करून चीनला 'योग्य' संदेश दिला. तर जर्मनीचे भारतातील राजदूत वॉल्टर लिंडन यांनीदेखील शहीद जवानांप्रती सहवेदना प्रकट केली.अमेरिका, फ्रान्स, जर्मनीचे राष्ट्रप्रमुख गेल्या सहा वर्षात भारत दौºयावर आले होते, हे विशेष. एरवी अमेरिकेविरोधात चीनची तळी उचलणाºया रशियाने मात्र गलवान प्रकरणी संयमी भूमिका घेतली.रशियाचे परराष्ट्रमंत्री सरगे लॅवरो यांनी भारत-चीनमध्ये सुरू असलेल्या चर्चेचे स्वागत केले. रशियाचे राष्ट्राध्यक्ष वाल्दिमीर पुतीन यांचे प्रवक्ते डॅमट्री पेस्कोव्ह म्हणाले, '(भारत-चीन) दोन्ही आमचे अत्यंत निकटचे सहकारी आहेत.

टॅग्स :chinaचीनFranceफ्रान्सAmericaअमेरिका