शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
3
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
4
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
5
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
6
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
7
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
8
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
9
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
10
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
11
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
12
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
13
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
14
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
15
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
16
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
17
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
18
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
19
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
20
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत

India China Border: भारताला कोरोनाशी झुंजण्यात अडकविले; चीनकडून लडाखच्या सीमेवर पुन्हा युद्धाची तयारी सुरु

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2021 11:51 IST

China Preparing for War with India in Ladakh border again After Last year Galwan Clash: भारत कोरोना संकटात सापडलेला असताना चीन ही तयारी करू लागला आहे. महत्वाचे म्हणजे जिथे ही रॉकेट तैनात केली आहेत तो भाग गलवान खोऱ्यालगतचा आहे.

India China Border: बिजिंग : कोरोनाच्या पहिल्या लाटेत (Corona Virus Pandemic) एकाबाजुने भारत जगासाठी धावून जात होता, तर दुसऱ्या बाजुने कोरोनाशी लढा देत होता. तेव्हा विश्वासघातकी चीननेलडाखच्या सीमेवर (India China Border Dispute) त्याचा फायदा उठविण्याचा प्रयत्न केला होता. गलवान घाटीत (Galwan Ghati) भारतीय जवानांवरील हल्ला परतवून लावल्याने बराच काळ तणाव निर्माण झाला होता. आता पुन्हा भारत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत पुरता घुसमटलेला असताना चीनने पूर्व लडाखमधील सीमेवर युद्धाची तयारी वेगवान केली आहे. (Ngari Tibet, 2nd Artillery Brigade under PLA Xinjiang Military District received PHL-03 12-tube 300mm long-range multiple rocket launchers.)

Chinese Rocket Landing: चीनचे अनियंत्रित रॉकेट अखेर भारतीय समुद्रात कोसळले; जगाने सुटकेचा नि:श्वास सोडला

चीनने घातकी आणि लांब पल्ल्यावर मारा करू शकणारे अत्याधुनिक PHL-03 मल्टिपल रॉकेट लॉन्‍चर्स तिबेटच्या भारतीय सीमेजवळ तैनात केले आहेत. चीनच्या सरकारी टीव्ही चॅनेलने सीसीटीव्हीने याबाबतचे वृत्त दिले आहे. ही रॉकट लाँचर्स भारतीय सीमेवर तैनात असलेल्या शिंजियांग कमांडकडे सोपविण्यात आली आहेत. 

सीसीटीव्हीच्या दाव्यानुसार हे रॉकेट ट्रकवरून नेता येऊ शकते. तसेच हे रॉकेट पूर्णपणे कॉम्प्युटर संचलित आहे. तसेच एकाचवेळी अनेक ठिकाणांना लक्ष्य करू शकते. साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्या रिपोर्टनुसार ही रॉकेट लाँचर्स लडाख सीमेवर 5200 मीटर उंचीवर तैनात करण्यात आली आहेत. हा तोच भाग आहे जिथे गेल्या वर्षी गलवान हिंसा झाली होती. 

हे रॉकेट लाँचर्स वेगाने तैनात केले जाऊ शकतता. तसेच प्रमुख भागांमध्ये कब्जाही करता येऊ शकतो. या रॉकेट लाँचर्समुळे चिनी सैनिक तिबेटच्या पठारी भागात, वाळवंटी भाग आणि प्रत्येक ऋतूमध्ये युद्ध लढू शकतात. या रॉकेट लाँचरमध्ये 12 ट्यूब आहेत, ज्यात 12 इंच कॅलिबरची बॅरल आहेत. प्रत्येक रॉकेटचे वजन हे 800 किलो आहे. या रॉकेटची मारकक्षमता ही 60 किमी प्रति तासाच्या वेगाने 130 किमीपर्यंत आहे. 

विकृत चीन! भारतातील पेटत्या चितांवरून उडविली खिल्ली; कम्युनिस्ट पार्टीची जगभर नाचक्की

सीसीटीव्हीच्या दाव्यानुसार केवळ 3 मिनिटांत ही रॉकेट सिस्टिम युद्धासाठी तयार होते. ही सिस्टिम चीनच्या बाईदू सिस्टिमशी जोडण्यात आली आहे, त्यामुळे ही सिस्टिम योग्य निशाना साधू शकेल. याशिवाय चीनने लडाखमध्ये भारतीय जवानांना उत्तर देण्यासाठी खूप हलक्या वजनाचे 15 टँक, 155 मिमीच्या 181 तोफा आणि पर्वतरांगांमध्ये उड्डाण करू शकणारे ड्रोन तैनात केले आहेत. ही तयारी भारत कोरोना संकटात सापडलेला असताना चीन करू लागला आहे. 

टॅग्स :chinaचीनladakhलडाखindia china faceoffभारत-चीन तणावcorona virusकोरोना वायरस बातम्या