शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

भारत देऊ शकतो पाकला लष्करी उत्तर, अमेरिकेच्या गुप्तचर संस्थांचा काँग्रेसला अहवाल सादर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2021 06:42 IST

US intelligence reports : ओडीएनआयच्या अहवालानुसार अफगाणिस्तान, इराक आणि सिरियातील संघर्ष हा अमेरिकेच्या सशस्त्र दलांवर थेट परिणाम करणारा आहे, तर अण्वस्त्रधारी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावाची काळजी संपूर्ण जगाला आहे, असे अहवालात म्हटले आहे.

वॉशिंग्टन : पाकिस्तानकडून होणाऱ्या खऱ्याखुऱ्या किंवा अप्रत्यक्ष चिथावणीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारत पूर्वीच्या तुलनेत लष्करी शक्तीने उत्तर देऊ शकतो, असे अमेरिकेच्या गुप्तचर संस्थांनी काँग्रेसला दिलेल्या अहवालात म्हटले आहे. राष्ट्रीय गुप्तचर संचालनालय कार्यालयाने (ओडीएनआय) अमेरिकन काँग्रेसला सादर केलेल्या आपल्या वार्षिक ‘ॲन्युअल थ्रेट असेसमेंट’ अहवालात म्हटले आहे की, ‘भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामान्य युद्ध शक्य नाही, तरी दोन्ही देशांतील तणाव हा अधिक तीव्र होण्याच्या जोखमीची शक्यता आहे.’ ‘पाकिस्तानकडून असलेल्या अप्रत्यक्ष किंवा प्रत्यक्ष चिथावणीखोर वर्तनाला पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारत हा पूर्वीच्या भारताच्या तुलनेत लष्करी शक्तीने तोंड देण्याची शक्यता आहे आणि वाढलेल्या तणावामुळे अण्वस्त्रधारी उभय देशांत संघर्षाची जोखीम वाढली आहे. काश्मीरमधील हिंसक अशांतता किंवा भारतातील अतिरेकी हल्ल्यांमुळे संघर्षाची शक्यता वाढली आहे,’ असे अहवालात म्हटले आहे. ओडीएनआयच्या अहवालानुसार अफगाणिस्तान, इराक आणि सिरियातील संघर्ष हा अमेरिकेच्या सशस्त्र दलांवर थेट परिणाम करणारा आहे, तर अण्वस्त्रधारी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावाची काळजी संपूर्ण जगाला आहे, असे अहवालात म्हटले आहे.

काश्मिरचा विशेष दर्जा रद्द केल्याने बिघडले संबंध - भारताने ५ ऑगस्ट, २०१९ रोजी जम्मू आणि काश्मीरचा घटनेतील विशेष दर्जा रद्द करून त्याचे रूपांतर दोन केंद्रशासित प्रदेशांत केल्यापासून भारत आणि पाकिस्तान यांचे संबंध खूपच बिघडले व तेव्हापासून दोन्ही देशांच्या राजधानीत एकमेकांचे उच्चायुक्त नाहीत. - दहशतवाद, हिंसाचार आणि शत्रूत्वमुक्त वातावरणात शेजारी पाकिस्तानसोबत सामान्य संबंध असावेत, अशी आमची इच्छा असून, दहशतवाद आणि शत्रूत्वमुक्त वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी पाकिस्तानची आहे, असे भारताने म्हटले आहे. 

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानPakistanपाकिस्तानAmericaअमेरिका