शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

"...तर हिंदुस्तान जबाबदार असेल!" शेख हसीना यांच्या प्रत्यर्पणाची मागणी करत युनूस सरकारची भारताला धमकी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2025 09:05 IST

India Bangladesh Relation : बांगलादेशच्या आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणाने अर्थात ICT ने शेख हसीना यांच्यासह अनेक माजी कॅबिनेट मंत्री, सल्लागार आणि लष्करी तथा नागरी अधिकाऱ्यांविरोधात "मानवतेविरोधातील गुन्हे आणि नरसंहारा"साठी अटक वॉरंट जारी केले आहे.

सरकार पदच्युत पंतप्रधान शेख हसीना आणि इतरांना भारतातून परत आणण्यासाठी प्रत्यार्पण करारानुसार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे, असे बांगलादेशचे गृह सल्लागार लेफ्टनंट जनरल (निवृत्त) मोहम्मद जहांगीर आलम चौधरी यांनी बुधवारी म्हटले आहे. शेख हसीना (७७) या गेल्या ५ ऑगस्टपासून भारतात राहत आहेत. बांगलादेशात विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या व्यापक निदर्शनानंतर त्यांचा पक्ष अवामी लीगचे १६ वर्षांचे सरकार पडले आणि त्या भारतात आल्या.

बांगलादेशच्या आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणाने अर्थात ICT ने शेख हसीना यांच्यासह अनेक माजी कॅबिनेट मंत्री, सल्लागार आणि लष्करी तथा नागरी अधिकाऱ्यांविरोधात "मानवतेविरोधातील गुन्हे आणि नरसंहारा"साठी अटक वॉरंट जारी केले आहे.

बीएसएस या सरकारी वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, चौधरी यांनी म्हटेल आहे की, ‘‘जे लोक मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांच्या आरोपाखाली आयसीटीमध्ये खटल्याला सामोरे जात आहेत, अशांना परत आणण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत." आयसीटीने अटक वॉरंट जारी केलेल्या 100 हून अधिक आरोपिंच्या अटकेसंदर्भात सरकारने उचलेल्या पावलांसंदर्भात विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना, त्यांनी हे भाष्य केले. चौधरी म्हणाले, “आम्ही देशातील लोकांना अटक करत आहोत. मुख्य व्यक्ती (हसीना) देशात नाही. परदेशात असलेल्यांना आपण कसे अटक करणार?" ते पुढे म्हणाले, त्यांना परत आणण्यासाठी कायदेशीर प्रयत्न सुरू आहेत. हसिना यांच्याविरोधात रेड नोटीस जारी करण्यासंदर्भात विचारले असता, पोलिस प्रमुख बहरुल आलम म्हणाले, इंटरपोल लवकरच आयसीटीला हव्या असलेल्या व्यक्तींविरोधात नोटीस जारी करेल, अशी आशा आहे. तसेच, "आयसीटीने रेड नोटीस जारी केल्याने, त्यांना अटक करण्याची जबाबदारी यजमान देशाची आहे," असेही ते म्हणाले.

"...तर भारत जबाबदार असले" -संबंधित वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, माहिती आणि प्रसारण सल्लागार नाहिद इस्लाम म्हणाले, "आम्ही, शेख हसीना यांना बांगलादेशात परत पाठविण्याची मागणी भारत सरकारकडे केली आहे. हा एक राजकीय मुद्दा आहे. मात्र, शेख हसीना यांनी तेथून (भारतातून) राजकारण करण्याचा प्रयत्न केला आणि भारतात राजकीय बैठका घेतल्या, तर त्यासाठी भारत सरकार जबाबदार असेल.’’ 

टॅग्स :BangladeshबांगलादेशIndiaभारत