शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

भारत, चीनमध्ये अमेरिकेपेक्षाही जास्त कोरोना रुग्ण सापडतील

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2020 02:49 IST

डोनाल्ड ट्रम्प; वैद्यकीय चाचण्यांची संख्या वाढवण्याची सूचना

वॉशिंग्टन : भारत व चीनने अधिकाधिक वैद्यकीय चाचण्या केल्या तर त्या देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण अमेरिकेपेक्षा जास्त प्रमाणात सापडतील असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. ते म्हणाले की, अमेरिकेने आतापर्यंत कोरोनाच्या २ कोटी चाचण्या केल्या आहेत. जर्मनीने ४० लाख तर दक्षिण कोरियाने तीस लाख चाचण्या केल्या आहेत. भारताने आतापर्यंत कोरोनाच्या चाळीस लाखांहून अधिक चाचण्या केल्या.

जॉन्स हॉपकिन्स कोरोना व्हायरस रिसोर्स सेंटरने म्हटले आहे की, अमेरिकेत कोरोनाचे १९ लाखांहून अधिक रुग्ण आढळले असून, या आजारामुळे तिथे बळी गेलेल्यांची संख्या १ लाख ११ हजारांवर पोहोचली आहे. कोरोनाच्या साथीचा सर्वात मोठा फटका अमेरिकेला बसला आहे. भारतामध्ये कोरोना रुग्णांची संख्या २ लाख ३६ हजारांपेक्षा जास्त झाली असून, चीनमध्ये हा आकडा ८३ हजारांपेक्षा अधिक झाला आहे.या पार्श्वभूमीवर डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, कोरोनाच्या चाचण्या जेवढ्या जास्त संख्येने होतील तेवढे अधिकाधिक रुग्ण सापडत जातील. भारत व चीनमध्ये चाचण्यांचे प्रमाण वाढविले तर तिथेही कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचे दिसून येईल. अमेरिकेतील आरोग्य यंत्रणा या साथीवर नियंत्रण मिळविण्यासाठी उत्तम काम करत आहे. स्वॅब घेण्याची सामुग्री बनविणाऱ्या प्युरिटन या अमेरिकी कंपनीच्या कार्यक्रमात बोलताना ट्रम्प म्हणाले की, प्युरिटन कंपनी अतिशय उच्च दर्जाची स्वॅब साधने निर्माण करत आहे. त्यामुळे कोरोनाचे झपाट्याने निदान होण्यास मोठी मदत झाली आहे. (वृत्तसंस्था)

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याDonald Trumpडोनाल्ड ट्रम्प