शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

फक्त रशियन तेल खरेदी नाही, या गोष्टींमुळे अमेरिका भारतावर नाराज; परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2025 11:10 IST

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर २५ टक्के कर लावला आहे.

India-America Trade: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर २५ टक्के कर लावला आहे. येत्या ७ ऑगस्टपासून अमेरिकेत विक्री होणाऱ्या भारतीय वस्तुंवर हा कर लागू असेल. भारत आणि अमेरिका यांच्यात अद्याप व्यापार करार न झाल्यामुळे ट्रम्प यांनी हा लागू केला आहे. दोन्ही देशांमध्ये अद्याप करार न होण्याचे प्रमुख कारण म्हणजे, भारताला आपल्या शेती आणि दुग्ध क्षेत्रात परकीय हस्तक्षेप नकोय. तर, अमेरिकेला भारताच्या कृषी बाजारपेठेत, विशेषतः अनुवांशिकरित्या सुधारित (GM) पिके, दुग्धजन्य पदार्थ, कॉर्न, सोयाबीन, सफरचंद, बदाम आणि इथेनॉल यासारख्या उत्पादनांमध्ये थेट प्रवेश हवाय. 

भारत-रशिया संबंधांवर अमेरिका नाराजअशातच, फॉक्स रेडिओला दिलेल्या मुलाखतीत अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी गुरुवारी सांगितले की, भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्यामुळेच रशियाला युक्रेनशी युद्ध करण्यास मदत होत आहे. त्यांनी यालाच भारत-अमेरिका संबंध बिघडण्याचे कारण म्हटले. रशियाकडून या गोष्टी खरेदी करतात, कारण रशियन तेलावर बंदी असल्यामुळे ते स्वस्त मिळत आहे. कधीकधी ते जागतिक किमतीपेक्षाही कमी किमतीत विकले जाते. दुर्दैवाने ते याद्वारे रशियाला युद्धात मदत करत आहे. मात्र, हा एकमेव मुद्दा नाही, असेही त्यांनी म्हटले. 

अमेरिकेला भारताकडून काय हवे आहे?भारत आणि अमेरिकेतील व्यापार करारावर स्वाक्षरी न करण्याचे एक प्रमुख कारण म्हणजे भारताला शेती आणि दुग्ध क्षेत्रात परकीय हस्तक्षेप नकोय. तर, अमेरिका या क्षेत्रांमध्ये शुल्क कमी करण्याची मागणी करत आहे. भारताचे म्हणणे आहे की, अमेरिकेतून स्वस्त आणि अनुदानित कृषी उत्पादनांना भारतात प्रवेश देणे देशातील कोट्यवधी लहान शेतकऱ्यांच्या उत्पन्नासाठी मोठा धोका ठरेल.

भारताने काय उत्तर दिले?भारताने अमेरिकेला स्पष्टपणे सांगितले आहे की, सध्या दुग्धजन्य पदार्थ, तांदूळ, गहू आणि अनुवांशिकरित्या सुधारित पिकांवर (जसे की मका आणि सोयाबीन) शुल्क कमी करणे शक्य नाही. अशा निर्णयामुळे देशातील ७० कोटी ग्रामीण लोक प्रभावित होऊ शकतात, ज्यात सुमारे ८ कोटी लहान दुग्ध उत्पादक शेतकरी आहेत. 

 

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पAmericaअमेरिकाIndiaभारतNarendra Modiनरेंद्र मोदीEconomyअर्थव्यवस्थाbusinessव्यवसाय