शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

Independence Day 2021 : सातासमुद्रापार तिरंगा झेंडा फडकवत स्वातंत्र्य दिन साजरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2021 07:05 IST

Independence Day 2021 : हा सोहळा वॉशिंग्टन डीसीच्या मराठी कला मंडळाने दिमाखात साजरा केला.

यंदाचा १५ ऑगस्ट म्हणजे भारताचा ७५वा स्वातंत्र्यदिन.  याचा अर्थ आजपासून भारताच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव सुरू झालेला आहे. केवळ भारतातल्या कोट्यावधी  जनतेनेच नव्हे तर जगभर पसरलेल्या लाखो भारतीय लोकांनी या अमृतमहोत्सवाची सुरूवात एकत्र येऊन साजरी केली. 

हा सोहळा वॉशिंग्टन डीसीच्या मराठी कला मंडळाने दिमाखात साजरा केला. कोव्हिड १९ मुळे समस्त मराठी जनतेला एका ठिकाणी जमवणे सध्या शक्य नसल्याने, वॉशिंग्टनच्या मराठी जनतेचे प्रतिनिधी म्हणून मंडळाचे  कार्यकारी समितीचे लोक एकत्र आले. संपूर्ण सोहळ्याचे झूमद्वारे थेट प्रक्षेपण करण्यात आले.

कार्यक्रमाच्या काही दिवस आधी, कार्यक्रमाची कल्पना देणारा उत्तम दर्ज्याचा टीझर  कार्यकारी  समितीच्या सदस्यांनी निर्माण केला आणि इमेल आणि वेबसाईटद्वारे वॉशिंग्टनच्या मराठी जनतेला पाठवण्यात  आला. कार्यकारी समितीने भारतीय स्वातंत्र्यदिनाला साजेशी सजावट केली. आपल्या मायभूमीला वंदन करण्याकरता योग्य ती वेषभूषा लेवून समस्त  कार्यकारी सदस्य एकत्र आले. 

मंडळाचे विद्यमान अध्यक्ष श्री. श्रीरंग पांडे यांच्या हस्ते अमेरिकन आणि भारतीय झेंड्याचे ध्वजारोहण करण्यात आले. दोन्ही देशांची राष्ट्रगीतं वाजवली गेली. भारतीय राष्ट्रगीताच्या वेळी समस्त उपस्थित कार्यकारी सदस्यांनी राष्ट्रगीताच्या  संगीताबरोबर त्याचे गायन करून ध्वजवंदन केले. "भारतमाता की जय" या घोषणांनी परिसर दुमदुमला. विद्यमान उपाध्यक्षा पद्मिनी माहुरकर यांनी आपल्या सुंदर घराच्या बागेमधे हा सोहळा घडवून आणला.  ध्वजारोहणाच्या सोहळ्याच्या थेट प्रक्षेपणानंतर मंडळातल्या गुणी सदस्यांच्या देशभक्तीपर गीतांच्या गाण्यांचे प्रक्षेपण करण्यात आले. गायनवादन आणि त्याचबरोबर व्हिडिओ-साऊंड संकलनावर विशेष मेहनत घेऊन उत्तम दर्ज्याची हिंदी आणि मराठी गाणी सादर करण्यात आली. यानंतर कथ्थकगुरु पंडिता मनीषा साठे यांनी, वॉशिंग्टन डीसीकरता पुण्याहून खास सादर केलेला कथ्थकचा कार्यक्रम प्रक्षेपित करण्यात आला. 

झूम आणि युट्युबद्वारे शेकडो वॉशिंग्टनकर मराठी वासीयांनी या सोहळ्याचा लाभ घेतला आणि भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या अमृतमहोत्सवामधे भाग घेतला.

टॅग्स :Independence Dayस्वातंत्र्य दिनAmericaअमेरिका