शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

अमेरिकेतील घटनेने पोलीसही चक्रावला; मोटारीचा ‘ड्रायव्हर’ अवघ्या पाच वर्षांचा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2020 23:48 IST

आईने वाहनाला दिला होता नकार

लॉस एंजल्स : उटाह या अमेरिकेच्या पश्चिमेकडील राज्यातील महामार्गावर गेल्या सोमवारी लेनची शिस्त मोडून नागमोडी पद्धतीने जाणारी एक आलिशान मोटार शिटी वाजवून थांबविली असता ती मोटार चक्क पाच वर्षांचा मुलगा चालवत असल्याचे पाहून गस्त घालणारा पोलीसही चक्रावून गेला.

उटाह राज्याच्या हायवे पॅट्रोल पोलिसांनी या धक्कादायक घटनेची माहिती टिष्ट्वटरवर दिली व त्याचा व्हिडिओही प्रसिद्ध केला. या व्हिडिओमध्ये सुरुवातीस नागमोडी जााणाऱ्या एका ‘एसयूव्ही’ मोटारच्या बाजूने इतर अवजड वाहने वेगाने पुढे निघून जात असल्याचे दिसते. नंतर गस्त घालणाºया पोलिसांनी शिटी वाजविल्यावर ती रस्त्याच्या डाव्या बाजूला थोड्या अंतरावर जाऊन थांबते. थोड्याच वेळात तो शिटी वाजविणारा पोलीस मोटारीजवळ येतो व ही धक्कादायक बाब उघड होते.

या मुलाने सांगितलेली जी ‘स्टोरी’ उटाह हायवे पॅट्रोलने टिष्ट्वटरवर टाकली ती तर आणखीच अचंबित करणारी आहे. त्यात पोलिसांनी या मुलाचे नाव उघड केलेले नाही व व्हिडिओतही त्याचा चेहरा स्पष्ट दिसणार नाही, याची काळजी घेण्यात आली आहे. या मुलाला ‘लॅम्बॉर्गिनी’ कंपनीची अतिमहाग व आलिशान मोटार हवी होती. ती देण्यास आईने नकार दिला दिला म्हणून तो नाराज होता. सोमवारी आई-वडील दोघेही कामासाठी बाहेर गेल्यानंतर हा मुलगा व त्याचा मोठा भाऊ, असे दोघेच घरात होते. भाऊ झोपला आहे, हे पाहून त्याने स्वत:च शोरूममध्ये जाऊन ‘लॅम्बॉर्गिनी’ आणण्याचे ठरविले. पैशाचे पाकीट रुबाबात खिशात कोंबत हे महाशय घराबाहेर पडले.एसयूव्ही कार विकत घेण्यासाठी मुलाच्या पाकिटात होते तीन डॉलर3-4 कि.मी. घरापासून चालवत त्याने मोटार हायवेवर आणली आणि गस्त घालणाºया पोलिसाने त्याला थांबविले. पोलिसांनी तपासणी केली असता पाकिटात तीन डॉलर घेऊन हा मुलगा रुबाबात ‘लॉम्बॉर्गिनी’ आणण्यासाठी निघाला होता, असे निष्पन्न झाले. या घटनेत कोणताही अपघात झाला नाही. वडिलांची एक ‘एसयूव्ही’ मोटार गॅरेजमध्ये उभी होती. घराच्या व्हरांड्यात इतर चाव्यांच्या जुडग्यांसोबत हुकाला अडकविलेली चावी घेऊन या मुलाने गॅरेजमधील ‘एसयूव्ही’ बाहेर काढली.

टॅग्स :carकारAmericaअमेरिका