शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

ऐकावं ते नवलच! 'या' देशात शरीराच्या वजनाइतकं मिळत कर्ज, लठ्ठपणा ठरतं श्रीमंतीच लक्षण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2025 09:32 IST

लठ्ठपणा ही एक वाढती आरोग्यसमस्या ठरत असताना, आफ्रिकेतील काही देशांमध्ये मोठे शरीर आणि सुटलेले पोट हे अजूनही श्रीमंतीचे लक्षण मानले जाते.

जगभरात लठ्ठपणा ही एक वाढती आरोग्यसमस्या ठरत असताना, आफ्रिकेतील काही देशांमध्ये मोठे शरीर आणि सुटलेले पोट हे अजूनही श्रीमंतीचे लक्षण मानले जाते. या पार्श्वभूमीवर, लोक मुद्दाम वजन वाढवत आहेत, पण त्यामुळे त्यांचे आरोग्य धोक्यात येत असल्याचे चिंताजनक वास्तव उघड झाले आहे. केनियामध्ये, स्थूल लोकांना अनेकदा बॉस किंवा मुकुब्वा म्हणतात. स्वाहिली भाषेत याचा अर्थ मोठा माणूस असा होतो. याच दरम्यान, एक देश मात्र लोकांना त्यांच्या वजनाकडे बघून कर्ज देत आहे.

या देशात लठ्ठ लोकांना सहज कर्ज मिळतेयुगांडाची परिस्थिती अशी आहे की, एखादी व्यक्ती जितकी जास्त लठ्ठ  असेल, तितकेच त्याला कर्ज सहज मिळते. कर्ज अर्जात वजन देखील लिहिलेले असते. या देशात असे मानले जाते की, एखाद्या व्यक्तीचे वजन जितके जास्त असेल, तितकेच तो कर्ज फेडू शकेल. तर केनियातील लोकांचा असा विश्वास आहे की, पैसे मिळताच त्यांचे वजन झटपट वाढू लागते. वजन वाढले नाहीतर, लोकांना ती व्यक्ती श्रीमंत आहे हे कळत नाही, असा या लोकांचा समज आहे. मात्र, या सगळ्यात ते या गोष्टीकडे लक्ष देत नाहीत की, ते अशा आजारांना आमंत्रण देत आहेत, जे त्यांना मृत्यूकडे ढकलू शकतात.

लठ्ठपणावर जनजागृती सुरू 

वर्ल्ड ओबेसिटी अॅटलसनुसार, केनियातील एक तृतीयांश लोक अजूनही दररोज दोन वेळचे अन्न खाऊ शकत नाहीत. तर, या देशात केवळ १३ टक्के लोक लठ्ठ आहेत. एकीकडे लोक पोट भरण्यासाठी धडपडत आहेत, तर दुसरीकडे लोक आपली श्रीमंती दाखवण्यासाठी आपले वजन वाढवत आहेत.

मात्र, आता अनेक आफ्रिकन देशांमध्ये लठ्ठपणावर चर्चा सुरू झाली आहे. तरुण राजकारणी आता लठ्ठपणाचा मुद्दा उपस्थित करत लोकांना याचे दुष्परिणाम सांगत आहेत. केनियामधील परिस्थिती अशी आहे की, बहुतेक लोक या कारणामुळे आजारी पडतात आणि मरतात. आरोग्य मंत्रालयाच्या अहवालानुसार, दरवर्षी ३९ टक्के मृत्यू लठ्ठपणामुळे होतात.

टॅग्स :Jara hatkeजरा हटके