शहरं
Join us  
Trending Stories
1
९ जुलैला भारत बंद, २५ कोटी कामगार संपावर; शाळा, कॉलेज, बँका आणि बाजारासह काय-काय बंद राहणार? जाणून घ्या
2
तिरुपतीला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा दुर्वैवी मृत्यू; कार उलटल्याने झाला भीषण अपघात
3
'भारतासह ब्रिक्स देशांना द्यावा लागणार अतिरिक्त १० टक्के कर"; व्यापार करारापूर्वी ट्रम्प यांचे विधान
4
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
5
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
6
२ कोटींच्या विम्यासाठी मित्राला गाडीत जिवंत जाळलं; नऊ महिने सुरु होती प्लॅनिंग, पत्नीचाही सहभाग
7
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
8
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
9
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
10
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
11
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

हिजाब न घातल्यास १० वर्षांचा कारावास; इराणच्या संसदेत कठोर कायदा मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2023 11:55 IST

इराणमध्ये महिलांनी दीर्घकाळ हिजाब विरोधात लढाई केली.

Iran Hijab News । नवी दिल्ली : इराणमध्ये महिलांनी दीर्घकाळ हिजाब विरोधात आक्रमक लढाई लढली आहे. हिजाबच्या विरोधात अनेक महिलांनी प्रसंगी रस्त्यावर उतरून हा लढा तीव्र केला. पण, या आंदोलक महिलांना सरकारी प्रशासनाच्या कठोर कारवाईला सामोरे जावे लागले. आंदोलनादरम्यान केलेल्या कडक कारवाईमुळे 'महसा' नावाच्या महिलेचा कोठडीत मृत्यू झाला होता. अशातच इराणच्या संसदेने हिजाबबाबत एक मोठा निर्णय घेतला असून नवीन कठोर कायदा मंजूर केला आहे. 

दरम्यान, इराणच्या संसदेने बुधवारी सार्वजनिक ठिकाणी अनिवार्य इस्लामिक हिजाब घालण्यास नकार देणाऱ्या आणि त्यांना पाठिंबा दर्शवणाऱ्या महिलांना शिक्षेची तरतूद असलेले विधेयक मंजूर केले. हिजाबला विरोध केल्याबद्दल पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आणि नंतर मृत्यू झालेल्या २२ वर्षीय महसाच्या पुण्यतिथीनंतर काही दिवसांतच हे विधेयक मंजूर करण्यात आले. खरं तर पोलिसांनी महसावर अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर रूग्णालयात उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. 

कायदा मोडल्यास १० वर्षांपर्यंत कारावासमाहितीनुसार, १६ सप्टेंबर २०२२ रोजी महसा या आंदोलक महिलेचा मृत्यू झाला होता. इराणच्या संसदेत मंजूर झालेल्या विधेयकात तरतूद आहे की, जर एखाद्या महिलेने हिजाब परिधान करण्यास विरोध केला किंवा तिला प्राधान्य देणाऱ्या आणि अशा महिलांना सेवा देणाऱ्या आस्थापनांच्या मालकांना शिक्षेची तरतूद आहे. तसेच हा गुन्हा एखाद्या समूहातर्फे झाला तर, कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांना दहा वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. लक्षणीय बाब म्हणजे इराणच्या २९० जागांच्या संसदेत १५२ खासदारांनी हे विधेयक मंजूर केले आहे. 

टॅग्स :IranइराणMuslimमुस्लीम