शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

मज्जाच मजा! ४ दिवस काम, तीन दिवस रजा; घरी गेल्यानंतर कामाचे निरोपही पाहू नका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2022 06:47 IST

हे नवीन कामगार कायदे येत्या काही दिवसांमध्येच लागू करण्यात येणार आहेत.

नवी दिल्ली : आता आठवड्यातून केवळ चार दिवसच काम करावे लागणार असून, तीन दिवस रजा मिळणार आहे. तसेच सर्वात महत्त्वाचे म्हणजे घरी गेल्यानंतर कामाचे निरोप पाहायचीही गरज राहणार नाही. बेल्जियममधील कर्मचाऱ्यांना ही सुविधा मिळणार आहे. देशाची अर्थव्यवस्था आणि लोकांचे जीवनमान सुधारण्यासाठी कामगार कायदे बदलण्याचा निर्णय पंतप्रधान अलेक्झांडर डी. क्रू. यांनी घेतला आहे. त्यानुसार, कर्मचाऱ्यांना आठवड्यातून पाचऐवजी फक्त चार दिवस काम करावे लागणार आहे.

कामगार कायद्यांतील बदलांबाबत आपल्या मंत्र्यांबाबत रात्रभर चाललेल्या चर्चेनंतर अलेक्झांडर पत्रकारांना म्हणाले की, कोरोनामुळे आम्हाला अधिक लवचीकपणे काम करणे भाग पडले आहे. कर्मचाऱ्यांनाही त्यानुसार सवलत देणे आवश्यक आहे. या कायद्यांतर्गत सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे कामाचे तास संपल्यानंतर आपल्या ॲाफिसमधील फोन बंद ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. बेल्जियम सरकारच्या या बदलांमुळे येथील लोकांच्या जीवनाचा दर्जा सुधारण्यासाठी आणि त्यांना अधिक चांगले काम करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे. हे नवीन कामगार कायदे येत्या काही दिवसांमध्येच लागू करण्यात येणार आहेत.

काय आहे कायद्यांत?नवीन कायद्यानुसार कर्मचाऱ्यांना पाचऐवजी चार दिवसांमध्ये ३८ तास काम करावे लागेल. यामुळे कर्मचाऱ्यांना अधिक मोठी सुटी घेता येईल. या अंतर्गत एखाद्या कर्मचाऱ्याला आठवड्यात जास्त तास काम करण्याची परवानगी दिली जाईल, जेणेकरून तो पुढील आठवड्यात कमी काम करेल. मात्र, यासाठी त्याला बॉसची परवानगी घ्यावी लागेल.

या देशांमध्ये असते केवळ चार दिवस कामस्कॉटलंड, आइसलंड, स्पेन, जपान, संयुक्त अरब अमिराती.

टॅग्स :Employeeकर्मचारी