शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
3
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
4
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
5
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
6
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
7
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
8
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
9
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
10
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
11
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
12
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
13
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
14
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
15
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
16
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
17
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
18
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
19
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
20
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू

इम्रान खानच्या ट्विटर फॉलोईंग यादीत एकही भारतीय नाही, पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2018 17:50 IST

पाकिस्तान क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि पाकिस्तानचे भावी पंतप्रधान इम्रान खान यांच्या तहरीक ए इन्साफ या पक्षाने पाकिस्तान सार्वत्रिक निवडणुकांमध्ये मोठे यश मिळवले. इम्रान खान यांच्या पीटीआय पक्षाला 116 जागांवर विजय मिळाला.

इस्लामाबाद - पाकिस्तान क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि पाकिस्तानचे भावी पंतप्रधान इम्रान खान यांच्या तहरीक ए इन्साफ या पक्षाने पाकिस्तान सार्वत्रिक निवडणुकांमध्ये मोठे यश मिळवले. इम्रान खान यांच्या पीटीआय पक्षाला 116 जागांवर विजय मिळाला. त्यानंतर त्यांचा पक्ष पाकिस्तान लोकसभा सभागृहातील सर्वात मोठा पक्ष बनला आहे. त्यामुळे, समविचारी पक्षांना सोबत घेऊन इम्रान खान सरकार स्थापन करणार असून ते 11 ऑगस्ट रोजी पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतील. दिग्गज क्रिकेटर आणि पाकिस्तानचे भावी पंतप्रधान इम्रान हे ट्विटवरुन केवळ 19 जणांनाच फॉलो करतात. त्यामध्ये एकाही भारतीय व्यक्तीचा समावेश नाही. पण, बिग बी अमिताब बच्चन इम्रान यांच्या फॉलोअर्सच्या यादीत आहेत.

पाकिस्तानमधील निवडणुकांमध्ये इम्रान खान यांच्या पक्षाचा विजय झाल्यानंतर इम्रान हेच भावी पंतप्रधान बनतील, असा निष्कर्ष निघला आहे. तर, इम्रान यांचे पंतप्रधानपद भारताला धोक्याचे असल्याचेही अनेकांनी म्हटले. मात्र, क्रिकेटच्या माध्यमातून भारताशी सौहार्दाचे संबंध इम्रान यांचे बनल्याचेही काही क्रीडा समिक्षकांनी सांगितले. मात्र, एकंदरीतच इम्रान यांच्या ट्विटर अकाऊंटचा अभ्यास केल्यास त्यांच्या फॉलोईंग लिस्टमध्ये एकाही भारतीयाचा समावेश नाही. इम्रान यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन आतापर्यंत 5568 ट्विट्स केले आहेत. त्यातील शेवटचे ट्विट हे 25 जुलै करण्यात आले असून क्वेटा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध या ट्विटमधून नोंदविण्यात आला आहे. इम्रान यांच्या ट्विटर फॉलोअर्सची संख्या 8.15 मिलियन्स म्हणजेच 81 लाख 50 हजार एवढी आहे. तर इम्रान आपल्या ट्विटरवरुन केवळ 19 जणांना फॉलो करतात. त्यांच्या फॉलोईंग लिस्टमध्ये एकाही भारतीय व्यक्तीचा समावेश नाही. विशेष म्हणजे ज्या क्रिकेट विश्वातून इम्रान यांचे नाव मोठे झाले, त्या क्रिकेट विश्वातील एकही भारतीय व्यक्ती इम्रान यांच्या फॉलोईंग लिस्टमध्ये नाही. इम्रान फॉलो करत असलेल्या 19 जणांमध्ये पाकिस्तानमधील राजकीय नेते आणि पत्रकारांचा समावेश आहे. या 19 जणांपैकी 2 महिला असल्याचे दिसून येते. पण, बिग बी अमिताभ बच्चन हे इम्रान खान यांना फॉलो करत असल्याचे ट्विटरवरुन दिसत आहे. तर, इम्रान यांच्या या फॉलोईंग लीस्टमध्ये एकही भारतीय नसल्याने त्यांचे खरच भारताशी सौहार्दाचे संबध राहतील का, असा प्रश्न निर्माण होत आहे. दरम्यान, इम्रान यांचे नाव पाकिस्तानच्या पंतप्रधानपदासाठी घेण्यात येताच भारतातील जम्मू आणि काश्मीरमधून त्यांच्या ट्विटर फॉलोअर्सची संख्या वाढली आहे. त्यानंतर, अनुक्रमे अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, झारखंड आणि दादर व नगर हवेली येथून इम्रान यांच्या फॉलोअर्सच्या संख्येत वाढ झाली आहे. 

 

टॅग्स :Imran Khanइम्रान खानPakistanपाकिस्तानPakistan Electionsपाकिस्तान निवडणूक