शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

आता तरी भारतानं काश्मीरसह इतर मुद्द्यांवर चर्चा करावी, इम्रान खान यांची मोदींना विनवणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2019 09:07 IST

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पुन्हा एकदा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर दोन्ही देशांना भेडसावत असलेल्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी चर्चेचा प्रस्ताव दिला आहे.

इस्लामाबाद- पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पुन्हा एकदा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर दोन्ही देशांना भेडसावत असलेल्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी चर्चेचा प्रस्ताव दिला आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना एक पत्र लिहिलं आहे. भारत आणि पाकिस्तानमधील वाद विकोपाला गेलेला असताना इम्रान खान यांनी दुसऱ्यांना दोन्ही देशांमध्ये चर्चा व्हावी, अशी इच्छा बोलून दाखवली आहे. मोदींना लिहिलेल्या पत्रात इम्रान म्हणतात, लोकसभा निवडणुकीत तुम्हाला पुन्हा एकदा जनतेनं पंतप्रधान म्हणून निवडून दिल्याबद्दल मी अभिनंदन करतो. काश्मीरच्या वादग्रस्त मुद्द्यासह इतर सर्व मुद्द्यांवर सकारात्मक चर्चा व्हावी, अशी पाकिस्तानची इच्छा आहे. दोन्ही देशांनी एकमेकांना मदत केल्यास हे प्रश्न सुटू शकतात. जेणेकरून जनता गरिबीतून मुक्त होऊ शकेल. तसेच दोन्ही देशांच्या विकासासाठी ही चर्चा महत्त्वाची असल्याचंही इम्रान खान यांनी सांगितलं आहे. पाकिस्तानला दक्षिण आशियात शांती हवी आहे. त्यामुळेच स्थिरता आणि क्षेत्रीय विकासासाठी ही चर्चा महत्त्वाची आहे. काही दिवसांपूर्वी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं विजयाबद्दल फोनवरून अभिनंदन केलं.दोन्ही देश जनतेच्या भल्यासाठी काम करतील, अशी आशा खान यांनी व्यक्त केली. भारतीय उपखंडाच्या समृद्धासाठी हिंसामुक्त आणि दहशतवादमुक्त वातावरण आवश्यक असल्याचं मोदींनी खान यांना सांगितलं. फेब्रुवारीत पुलवामात झालेला हल्ला, त्यानंतर भारतानं केलेला एअर स्ट्राइक या घटनांमुळे दोन्ही देशांमधील संबंध ताणले गेले आहेत. या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांच्या पंतप्रधानांनी प्रथमच फोनवरुन संवाद साधला होता. पुलवामा हल्ल्यानंतर दोन्ही देशातील संबंध कमालीचे ताणले गेले आहेत. त्यानंतर भारतानं आंतरराष्ट्रीय स्तरावरून पाकिस्तानची नाकेबंदी केली होती. त्यानंतर आता पाकिस्तानकडून वारंवार चर्चेची मागणी केली जात आहे. 

टॅग्स :Imran Khanइम्रान खान