शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

Imran Khan: 'त्यांना चांगला धडा शिकवू, त्यांचे राजकारणा कबरीत दफन करणार', इम्रान खान यांचा विरोधकांना इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2022 19:05 IST

Imran Khan: 'ज्यांनी परकीय शक्तींसोबत देशाविरोधात कट रचला, त्यांना पाकिस्तानची जनता कधीच माफ करणार नाही.'

इस्लामाबाद:पाकिस्तानचे(Pakistan) काळजीवाहू पंतप्रधान इम्रान खान(Imran Khan) यांनी मंगळवारी लाहोरमध्ये एका जाहीर सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा पाकिस्तानचे सरकार पाडण्यासाठी परकीय षड्यंत्र रचल्याचा आरोप केला आहे. या कटातील अनेक सूत्रधारांना आपण या कटाचा एक भाग बनत आहोत याची कल्पनाही नव्हती, असे ते म्हणाले. तसेच, पाकिस्तानात येत्या तीन महिन्यांत निवडणुका होतील, अशी माहितीही त्यांनी दिली. 

विरोधकांवर जोरदार हल्लाबोलइम्रान खान यांनी आज पुन्हा परकीय षड्यंत्राचा उल्लेख केला आणि म्हणाले, पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणावर परकीय षडयंत्र रचले गेले. त्यांनी आमचे सरकार पाडण्याचा प्रयत्न केला. हे तेच लोक आहेत, ज्यांचे पैसे परदेशात आहेत. तुम्ही गुलाम आहात, आम्ही नाही. आम्ही स्वतंत्र आहोत, आम्ही कोणाचीही गुलामगिरी करत नाही. जे पीटीआयचे मत मिळवून आपला आत्मा विकत आहेत, त्यांना आजीवन बंदी भोगावी लागेल."

त्यांचे राजकारण दफन करू... इम्रान खान पुढे म्हणाले की, यावेळी आम्ही विरोधकांना चांगला धडा शिकवू. हा देश त्यांना सोडणार नाही. आम्ही त्यांचे राजकारण कबरीत दफन करू, असा इशाराच त्यांनी यावेळी दिला. तसेच, आम्ही आमच्या भूतकाळातून शिकलो, आता त्या चुका सुधारणार आणि कोणाला तिकीट द्यायचे यावर बारीक लक्ष देणार, असेही म्हणाले. यावेळी पाकिस्तानी नागरिकांना उद्देशून म्हणाले की, तुम्हा सर्वांना निवडणुकीची तयारी करावी लागेल. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानImran Khanइम्रान खान