शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

"इम्रान खान यांची पाकिस्तानी लष्कर हत्या करू शकतं"; बहिणीचा मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2024 18:30 IST

जेलमध्ये असलेले माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या कुटुंबीयांनी मोठा आरोप केला आहे.

जेलमध्ये असलेले पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या कुटुंबीयांनी मोठा आरोप केला आहे. इम्रान खान यांच्या बहिणीने न्यूज 18 ला सांगितलं की, लष्कराला इम्रान यांची हत्या करायची आहे. निवडणुकीत पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ पक्षाला दोन तृतीयांश बहुमत मिळाल्याचा दावाही त्यांनी केला. पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाच्या आकडेवारीवर नजर टाकली तर परिस्थिती काहीशी अशीच आहे. 

250 जागांवर मतमोजणी पूर्ण झाली असून अपक्ष उमेदवारांनी सर्वाधिक 99 जागा जिंकल्या आहेत. यातील बहुतांश उमेदवारांना माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा पक्ष पीटीआयचा पाठिंबा आहे. बहीण अलीमा खान यांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेक प्रकरणांमध्ये असं घडलं की, इम्रान खान यांचा पाठिंबा असलेले उमेदवार 80 हजारांहून अधिक मतांनी पुढे असूनही त्यांना पराभूत घोषित करण्यात आलं. दिवसाढवळ्या लूटमार झाली आणि मतांची चोरी झाली. नवाझ शरीफ यांचा पक्ष फक्त 50-60 जागा जिंकत आहे आणि त्यातही चोरी करत आहे. 

"दोन वेळा इम्रान खान यांच्या हत्येचा झाला प्रयत्न"

अलीमा यांनी "मी अद्याप इम्रान खान यांना भेटलेली नाही" असं म्हटलं आहे. आम्ही इम्रान यांना भेटू शकलो नाही, पण उद्या भेटू शकतो असं सांगत निवडणुकीत हेराफेरी झाल्याचा संशयही त्यांनी व्यक्त केला. यापूर्वी इम्रान यांच्या हत्येचा दोनदा प्रयत्न झाला होता. कोणी केलं हे आम्हाला माहीत आहे. आता तुरुंगात असताना त्यांच्या विजयानंतर परिस्थिती अधिक गंभीर झाली आहे असंही बहिणीने म्हटलं.

इम्रान खान जेलमध्ये असून त्यांच्यावर निवडणूक लढवण्यास बंदी घालण्यात आली आहे. इम्रान यांच्या पक्षाने निवडणुकीत विजयाचा दावा केला आणि निकालांमध्ये हेराफेरी करण्यासाठी निवडणूक निकाल जाहीर करण्यात विलंब केल्याचा आरोप केला. "रात्री उशीरा निकालात फेरफार करणे पूर्णपणे लज्जास्पद आणि उघडपणे केलेली चोरी आहे. पाकिस्तानच्या जनतेने हेराफेरीचे निकाल पूर्णपणे नाकारले. जग पाहत आहे" असं पक्षाने म्हटलं आहे.

टॅग्स :Imran Khanइम्रान खानPakistanपाकिस्तान