शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

'जैश' म्हणतं, आम्ही केला हल्ला... इम्रान खान भारताला म्हणतात, पुरावे द्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2019 14:22 IST

पुलवामा दहशतवादी हल्ल्यावर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

ठळक मुद्दे भारतावर हल्ला करून पाकिस्तानला काय फायदा होणार ?पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानचा हात नाही, कुठलेही पुरावे नसताना भारत पाकिस्तानवर आरोप करत सुटला आहे.भारतानं पहिल्यांदा आम्हाला पुरावे द्यावेत, मग आम्ही कारवाई करू, असंही इम्रान खान म्हणाले आहेत.

इस्लामाबाद- पुलवामा दहशतवादी हल्ल्यावर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी प्रतिक्रिया दिली आहे. विशेष म्हणजे पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा निषेध नोंदवण्याऐवजी त्यांनी भारतालाच खडे बोल सुनावले आहेत. भारतावर हल्ला करून पाकिस्तानला काय फायदा होणार ?, पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानचा हात नाही, कुठलेही पुरावे नसताना भारत पाकिस्तानवर आरोप करत सुटला आहे. भारतानं पहिल्यांदा आम्हाला पुरावे द्यावेत, मग आम्ही कारवाई करू, असंही इम्रान खान म्हणाले आहेत.तसेच दहशतवादाच्या मुद्द्यावर आमची भारताबरोबर चर्चेची तयारी असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. परंतु जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेनंच स्वतः पुलवाम्यात घडवून आणलेल्या हल्ल्याची कबुली दिली आहेत. जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहरनं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. तरीही पाकिस्तानचे पंतप्रधान यासंदर्भात भारताकडे पुरावे मागत असल्यानं देशपातळीवरून संताप व्यक्त केला जात आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पाकिस्तानच्या धर्तीवरूनच दहशतवाद पोसला जातोय. दहशतवाद्यांना पाकिस्तान हा देशच आश्रय देत असल्याचं नेहमीच सिद्ध झालं आहे. पुलवामा हल्ल्याचा साधा निषेध नोंदवण्यापेक्षा इम्रान खान यांनी भारतालाच धमकावण्याचा प्रयत्न केला. भारतात सध्या निवडणुकीचे वातावरण आहे. त्यामुळे पाकिस्तानवर हल्ला झाल्यास राजकीय लाभ मिळू शकतो.मात्र पाकिस्तानवर हल्ला केला तर पाकिस्तानही त्याला प्रत्युत्तर देईल, अशी धमकी इम्रान खान यांनी दिली. पुलवामा येथे झालेल्या आत्मघातकी दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानवर चौफेर दबाव आला असून, भारताकडूनही आक्रमक कारवाईसाठी मोर्चेबांधणी करण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर या प्रकरणी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी बाळगलेले मौन सोडत आज देशाला संबोधित केले. या संबोधनामध्ये इम्रान खान यांनी पुलवामा हल्लात पाकिस्तानचा हात असल्याचा दावा फेटाळून लावला. 

टॅग्स :pulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाImran Khanइम्रान खानPakistanपाकिस्तानterroristदहशतवादी