शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

Imran Khan: खिडकीच्या काचा फोडून कोर्ट रुममध्ये शिरले अन् इम्रान खान यांना पकडून नेले, पाहा Video...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2023 20:20 IST

Imran Khan: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना आज कोर्टातून अटक करण्यात आली आहे.

Imran Khan: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (PTI) पक्षाचे प्रमुख इम्रान खान यांना आज(मंगळवारी) अटक करण्यात आली. त्यांना पाकिस्तानी निमलष्करी दलाकडून इस्लामाबाद उच्च न्यायालयातूनच अटक करण्यात आली आहे. पाकिस्तानच्या इस्लामाबाद उच्च न्यायालयातून इम्रान यांच्या अटकेचे व्हिडिओ समोर आले आहेत. यात पाक रेंजर्स माजी पंतप्रधानांना धक्का देत कारमध्ये बसवताना दिसत आहेत.

काच फोडून आत शिरले

इम्रान खान यांच्या अटकेचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यात रेंजर्स कोर्टरुमची काच फोडून पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अटक करताना दिसत आहेत. दरम्यान, पीटीआयच्या ट्विटर हँडलवरून आणखी एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे, ज्यात इम्रान खानचे वकील गंभीर जखमी झाल्याचा दावा पक्षाने केला आहे.

अटक वॉरंट जारी

1 मे रोजी माजी पंतप्रधान इम्रान खान यांचे अटक वॉरंट NAB रावळपिंडीने जारी केले होते. आज अखेर पाक रेंजर्सनी त्यांना इस्लामाबादमध्ये अटक केली आहे. पण, पीटीआयचे म्हणणे आहे की, इम्रान यांना घेऊन जाताना कोणतेही वॉरंट दाखवले गेले नाही. पाकिस्तानी मीडियानुसार, अल-कादिर ट्रस्ट प्रकरणात इम्रानला इस्लामाबाद उच्च न्यायालयाबाहेर पाक रेंजर्सनी अटक केली आहे. इम्रान खान आपल्यावर दाखल असलेल्या अनेक गुन्ह्यांमध्ये जामीन घेण्यासाठी येथे आले होते.

इस्लामाबादमध्ये कलम 144 लागूइस्लामाबाद पोलिसांनी जारी केलेल्या निवेदनात इस्लामाबादमधील परिस्थिती सामान्य असल्याचेही म्हटले आहे. मात्र प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन शहरात कलम 144 लागू करण्यात आले असून त्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे.

टॅग्स :Imran Khanइम्रान खानPakistanपाकिस्तानInternationalआंतरराष्ट्रीय