शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

Imran Khan, Pakistan: पाकिस्तानात शरीफ यांचे सत्तेत येणे, इम्रान खानचे जाणे, भारतासाठी किती फायद्याचे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2022 08:26 IST

Imran Khan's Government Falls After Midnight No-Trust Vote: इम्रान खान यांनी गेल्या काही वर्षांपासून भारताविरोधात गरळ ओकली होती. सत्तेत आल्यावरही त्यांनी ते सुरुच ठेवले होते. परंतू सत्ता जाताना त्यांनी भारतावर स्तुतीसुमने उधळली होती.

अन्य पंतप्रधानांप्रमाणे क्रिकेटपट्टू इम्रान खान देखील पाकिस्तानच्या पंतप्रधान पदाची इनिंग पूर्ण करू शकले नाहीत. पाकिस्तानच्या राजकारणात रविवारचा दिवस ऐतिहासिक ठरला. मध्यरात्र उलटून गेल्यावर तिथे मोठमोठ्या घडामोडी घडल्या आहेत. सरकारशी संबंधीत एकाही व्यक्तीने देश न सोडण्याचे आदेश निघाले आहेत. एअरपोर्ट अलर्टवर ठेवण्यात आले आहेत. असे असताना पुन्हा शरीफांच्या हातात सत्तेचा चेंडू गेल्याने आता भारतासाठी कितपत फायद्याचे ठरू शकेल, यावर चर्चा होऊ लागली आहे. 

342 सदस्यांच्या नॅशनल असेम्ब्लीमध्ये इम्रान सरकारविरोधात 174 मते पडली. अगदी काठावर मते पडली असली तरी इम्रान यांची खूर्ची गेली आहे. या सत्तापरिवर्तनाचे अवघे जग साक्ष ठरले आहे. नवाझ शरीफ पंतप्रधान असताना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या वाढदिवसाला अचानक पाकिस्तानात हजेरी लावली होती. आता त्यांचे भाऊ शाहबाज शरीफ पंतप्रधान होण्याची शक्यता आहे. मतदानावेळी इम्रान खान संसदेत गैरहजर होते. आज दुपारी २ वाजता नवीन पंतप्रधान निवडला जाणार आहे. 

इम्रान खान यांनी गेल्या काही वर्षांपासून भारताविरोधात गरळ ओकली होती. सत्तेत आल्यावरही त्यांनी ते सुरुच ठेवले होते. परंतू सत्ता जाताना त्यांनी भारतावर स्तुतीसुमने उधळली होती. याचबरोबर अमेरिकेला वाकड्यात घेताना पाकिस्तानी सैन्यावरदेखील प्रश्न उपस्थित केले होते. यामुळे शरीफांनादेखील या पावलाचा त्रास होणार आहे. इम्रान खान यांनी नवी दिल्लीशी चर्चेचे मार्ग बंद केले होते. काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेतल्यावर तर व्यापारी संबंधही संपविले होते. भाजपा आणि आरएसएसवर त्यांनी टीका सुरुच ठेवली होती. आता त्यांचे सत्तेतून बाहेर गेल्याने दिल्ली-इस्लामाबाद मधील चर्चेचा मार्ग खुला होण्याची शक्यता आहे. 

चार वर्षांपूर्वी शरीफ यांना सत्ता गमवावी लागली होती. शाहबाज यांच्या रुपाने आता पुन्हा सत्तेत वापसी झाली आहे. इम्रान यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्यात त्यांची महत्वाची भूमिका होती. नवाज शरीफ लंडनमध्ये आश्रयाला आहेत. मात्र, शाहबाज यांनी अविश्वास प्रस्तावावेळी त्यांची सतत आठवण काढली. ते भारताशी चांगले संबंध ठेवण्यासाठी प्रयत्नशील होते, असे सांगितले जाते.  

टॅग्स :Imran Khanइम्रान खानNarendra Modiनरेंद्र मोदीPakistanपाकिस्तान