शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

Imran Khan: इम्रान खानच्या अडचणीत वाढ; परदेशातून मिळालेल्या मौल्यवान भेटवस्तू विकून पैसे कमावल्याचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2022 20:48 IST

Imran Khan summoned: इम्रान खान यांना नोटीस जारी केली असून, 18 ऑगस्टला चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे.

Imran Khav Toshkhana controversy: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा कार्यकाळ वादग्रस्त राहिला आहे, मात्र पद सोडल्यानंतरही त्यांचा त्रास कमी झालेला नाही. आता इम्रान यांच्यावर पाकिस्तानच्या तोशाखान्यातून परदेशी पाहुण्यांकडून मिळालेल्या भेटवस्तू लाटल्याचा आरोप लागला आहे. पंतप्रधानांना भेट म्हणून मिळालेली आलिशान घड्याळे विकून कोट्यवधी रुपये कमावल्याचा आरोप इम्रानवर आहे. आता या संदर्भात इम्रान खान यांना नोटीस बजावण्यात आली असून 18 ऑगस्टला चौकशीसाठी बोलावले आहे.

जिओ टीव्हीच्या वृत्तानुसार, इम्रान खान यांच्यावर तोशाखान्यातून मौल्यवान भेटवस्तू घेतल्याचा आरोप झाल्यानंतर पाकिस्तानच्या निवडणूक आयोगात याचिका दाखल करण्यात आली आहे. पंतप्रधानपद सोडताना इम्रान यांनी भेटवस्तुचे पैसे न देता या वस्तू सोबत नेल्याचे बोलले जात आहे. पाकिस्तान डेमोक्रॅटिक मूव्हमेंट (PDM) ने दाखल केलेल्या याचिकेत हा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे आता इम्रान यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

लक्झरी घड्याळे आणि भेटवस्तू विकल्याएप्रिलमध्ये पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनीही इम्रानवर तोशाखान्यातील भेटवस्तू विकल्याचा आरोप केला होता. इम्रानवर दुबईत ज्वेलरी सेट ब्रेसलेट, मनगटी घड्याळे विकून 14 कोटी रुपये कमावल्याचा आरोप आहे. पाकिस्तान मुस्लिम लीग नवाज नेते मोहसीन शाहनवाज यांनी या प्रकरणी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. तोशाखान्यातून घेतलेल्या भेटवस्तूची माहिती न दिल्याने इम्रान खान यांना पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीमधून अपात्र ठरवण्याची मागणी करण्यात आली आहे.

काय सांगतो पाकिस्तानी कायदा?पाकिस्तानच्या कायद्यानुसार, विदेशी व्यक्तींकडून मिळालेली कोणतीही भेट सरकारी तोशाखान्यात ठेवली जाते. जर राष्ट्रप्रमुखाला या भेटवस्तू आपल्याजवळ ठेवायच्या असतील तर त्यांना त्याची किंमत मोजावी लागते. गिफ्टची किंमत लिलावाद्वारे ठरवली जाते. कायद्यानुसार या मौल्यवान भेटवस्तू तोषखान्यात साठवल्या जातात किंवा त्यांचा लिलाव केला जातो. यातून मिळणारा पैसा राष्ट्रीय तिजोरीत जमा करावा लागतो.  

टॅग्स :Pakistanपाकिस्तानImran Khanइम्रान खान