शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

Imran Khan: इम्रान खान अखेर ‘नॉट आऊट’, भांबावलेल्या विरोधकांची ‘डीआरएस’ची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2022 07:59 IST

Imran Khan: क्रिकेटच्या मैदानावर अष्टपैलू खेळ आणि धूर्त चालींनी प्रतिस्पर्धी संघाची भंबेरी उडवणाऱ्या इम्रान खान यांनी रविवारी पाकच्या नॅशनल असेम्ब्लीमध्ये अफलातून राजकीय खेळी करीत विरोधकांना त्रिफळाचीत केले.

इस्लामाबाद : क्रिकेटच्या मैदानावर अष्टपैलू खेळ आणि धूर्त चालींनी प्रतिस्पर्धी संघाची भंबेरी उडवणाऱ्या इम्रान खान यांनी रविवारी पाकच्या नॅशनल असेम्ब्लीमध्ये अफलातून राजकीय खेळी करीत विरोधकांना त्रिफळाचीत केले. अविश्वास ठराव मांडून इम्रान खान यांना पंतप्रधानपदावरून हटविण्याचा विरोधकांचा डाव इम्रान यांनी उधळून तर लावलाच शिवाय झटपट निर्णय घेत नॅशनल असेम्ब्ली बरखास्त करत येत्या तीन महिन्यांत मध्यावधी निवडणुका घेण्याचा इरादाही जाहीर केला. यामुळे भांबावलेल्या विरोधकांनी थेट सुप्रीम कोर्टात धाव घेत ‘डिसिजन रिव्ह्यू सिस्टीम’ अर्थात डीआरएसची मागणी केली आहे.

सरकारवरील अविश्वास ठराव रविवारी नॅशनल असेम्ब्लीमध्ये मांडण्यात आला. मात्र, हा विदेशी शक्तींचा डाव असल्याचे कारण देत उपसभापती कासीम खान सुरी यांनी ठराव फेटाळून लावला. त्यानंतर इम्रान यांनी मध्यावधी निवडणुका घेण्याची केलेली शिफारस अध्यक्ष अरीफ अल्वी यांनी मान्य केली. नॅशनल असेम्ब्ली बरखास्त करण्यात आली असून आता तीन महिन्यांच्या आत सार्वत्रिक निवडणुका घ्याव्या लागतील. तोपर्यंत इम्रान खान काळजीवाहू पंतप्रधान म्हणून काम पाहतील.

३४२ सदस्य असलेल्या नॅशनल असेम्ब्लीमध्ये अविश्वास ठराव संमत होऊन इम्रान यांना राजीनामा द्यावा लागणार, असे सर्व जण गृहीत धरून चालले होते. मात्र, प्रत्यक्षात उलट घडल्याने विरोधक स्तंभित झाले. असेम्ब्लीचे सभापती असद कैसर यांच्याविरोधातही विरोधी पक्षांनी अविश्वास ठराव दाखल केला होता. त्यामुळे उपसभापती कासीम खान सुरी यांच्याकडे कामकाजाची सूत्रे देण्यात आली. उपसभापतींनी अविश्वास ठराव फेटाळून लावत सर्व प्रकरणाला कलाटणी दिली. (वृत्तसंस्था)

सुप्रीम कोर्टात धाव- इम्रान यांच्या खेळीने भांबावलेल्या विरोधकांनी इम्रान सरकारचा निर्णय घटनाबाह्य असल्याचे सांगत आदळआपट सुरू केली. काहींनी पार्लमेंटच्या बाहेरच धरणे आंदोलन सुरू केले. - काही खासदारांनी थेट सर्वोच्च न्यायालयाकडे दाद मागण्याचा निर्णय घेतला. सर्व घटनांवर लक्ष ठेवून असलेल्या सर्वोच्च न्यायालयानेही स्वत:हून या राजकीय घडामोडींची दखल घेत सुनावणी सुरू केली. त्यानंतर सोमवारपर्यंत सुनावणी स्थगित करण्यात आली.- या घडामोडींवर लष्कराने मौन बाळगले. सरकारवरील अविश्वास ठराव फेटाळला गेल्यानंतर घडलेल्या घडामोडींशी काहीही संबंध नसल्याचे पाकिस्तानी लष्करातर्फे स्पष्ट करण्यात आल्याने गोंधळात भर पडली आहे.

पाकिस्तानने आता मध्यावधी निवडणुकांसाठी सज्ज व्हावे. भ्रष्टाचारी प्रवृत्तींच्या हाती आम्ही या देशाचे भविष्य सोपविणार नाही. लवकरच जनतेच्या दरबारात जाऊन आम्ही त्यांच्याकडे मतांचा जोगवा मागू.- इम्रान खान

टॅग्स :Imran Khanइम्रान खानPakistanपाकिस्तानPoliticsराजकारण