शहरं
Join us  
Trending Stories
1
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
2
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
3
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
4
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
5
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
6
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
7
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
8
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
9
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
10
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
11
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
12
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
13
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
14
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
15
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
16
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
17
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
18
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
19
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  

Imran Khan: आधीची बायको म्हणते, इम्रान खानने पाकची वाट लावली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2022 09:19 IST

रेहाम खान यांची कठोर टीका

इस्लामाबाद : पंतप्रधानइम्रान खान यांनी पाकिस्तानची पुरती वाट लावली आहे. त्यांच्या कारभारामुळे या देशात मोठा गोंधळ निर्माण झाला आहे, अशी कडक टीका त्यांची घटस्फोटित  पत्नी रेहाम खान यांनी केली. हा गोंधळ दूर करण्यासाठी आता पाकिस्तानच्या जनतेने एकवटले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले.

मित्रपक्ष मुत्ताहिदा कौमी मुव्हमेंटने (एमक्यूएम) पाठिंबा काढून घेतल्याने इम्रान सरकार अविश्वास ठरावावरील रविवारी होणाऱ्या मतदानाआधीच अल्पमतात गेले. नवा पाकिस्तान निर्माण करू, असा नारा देत सत्तेवर आलेले इम्रान खान देशातले मूलभूत प्रश्न सोडविण्यात अपयशी ठरले असल्याची टीका विरोधकांनी केली. त्यांच्या सुरात सूर मिसळत रेहाम खान यांनी म्हटले की, इम्रान यांच्याकडे पाकिस्तानचे पंतप्रधान होण्याइतकी बुद्धिमत्ता व पात्रता कधीही नव्हती. 

मला आयुष्यात कीर्ती, पैसा सारे मिळाले. मला अजून काही मिळवायची इच्छा नाही. मात्र,  पाकिस्तानला समर्थ राष्ट्र बनविण्याची माझी इच्छा आहे. महान राष्ट्र होण्याच्या दिशेने पाकिस्तानची झालेली वाटचाल मी बालपणापासून पाहत आलो आहे, असे इम्रान खान यांनी गुरुवारी म्हटले होते. त्याबद्दल रेहाम यांनी टोला लगावला की,  इम्रान खान पंतप्रधानपदी नव्हते, त्याआधी पाकिस्तान नक्कीच महान देश होता! (वृत्तसंस्था)

आरोप करणाऱ्या रेहाम खान आहेत कोण?इम्रान खान यांची माजी पत्नी रेहाम खान या पत्रकार, लेखक व चित्रपट निर्मात्या आहेत. ब्रिटनमधील एजाझ रेहमान यांच्याशी रेहाना यांचा पहिला विवाह झाला; पण तो टिकला नाही. त्यानंतर रेहाम यांनी २०१५ साली इम्रान खान यांच्याशी दुसरा विवाह केला. मात्र, कालांतराने त्यांचा घटस्फोट झाला. 

‘आता इतिहासजमा होणार, ते सपशेल अपयशी’n रेहाम खान यांनी म्हटले आहे की, पाकिस्तानच्या राजकारणातून इम्रान खान आता इतिहासजमा होणार आहेत. n इम्रान खान यांना स्तुतिपाठक प्रिय आहेत. क्रिकेट असो वा बाॅलिवूड तिथे उत्तम कामगिरी महत्त्वाची असते. राजकारणाचेही तसेच आहे. इम्रान खान राजकारणात सपशेल अयशस्वी ठरले.

टॅग्स :Imran Khanइम्रान खानPakistanपाकिस्तानprime ministerपंतप्रधान