शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
2
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
3
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
4
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
5
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
6
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
7
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
8
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
9
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
10
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
11
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
12
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
13
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
14
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
15
श्रीदेवीचा सुपरहिट सिनेमा 'मॉम'च्या सीक्वेलमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो लीक
16
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
17
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ
18
क्या बात! रितेश देशमुखच्या आईसाहेबांनी बल्बच्या प्रकाशात घेतलं ड्रॅगन फ्रूटचं पीक; सूनबाईंना कौतुक, शेअर केला व्हिडीओ
19
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

"खूप कॉमेडी टॅलेंट आहे, बॉलिवूड किंवा कपिल शर्मा शोमध्ये सहभागी व्हा", इम्रान खान यांना माजी पत्नीचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2022 15:58 IST

Reham khan : इम्रान खान यांची माजी पत्नी रेहम खान यांनी  त्यांना कपिल शर्माच्या कॉमेडी शोमध्ये जाण्याचा सल्ला दिला आहे.

नुकतेच पाकिस्तानच्या नॅशनल असेंबलीत (संसद) अविश्वास प्रस्ताव मंजूर झाला आणि दुसऱ्या क्षणी इम्रान खान यांचे सरकार कोसळले. सत्तास्थापनेच्या साडेतीन वर्षानंतर इम्रान खान सत्तेच्या खुर्चीवरून उतरले. पंतप्रधानपदाच्या खुर्चीवरून पायउतार झाल्यानंतर आता इम्रान खान हे लोकांमध्ये जाऊन सभा घेऊन आपला जनाधार वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. तर दुसरीकडे इम्रान खान यांची माजी पत्नी रेहम खान यांनी  त्यांना कपिल शर्माच्या कॉमेडी शोमध्ये जाण्याचा सल्ला दिला आहे.

रेहम खान यांनी इम्रान खान यांच्यावर भाष्य करताना म्हटले की, "त्याच्याकडे विनोदी प्रतिभा आहे आणि मी सुचविते की ते 'द कपिल शर्मा शो'मध्ये नवज्योत सिंग सिद्धू यांची जागा घेऊ शकतात." दरम्यान, संपूर्ण राजकीय संकटाच्या काळात रेहम खान यांनी सतत इम्रान खान यांना यांच्यावर निशाणा साधला होता. रेहम खान यांनी इम्रान खान यांना 'मिनी ट्रम्प' म्हणत पुन्हा हल्लाबोल केला.

एका पाकिस्तानी रिपोर्टरशी बोलताना रेहम खान यांनी इम्रान खान यांची खिल्ली उडवली आणि त्यांनी बॉलीवूडमध्ये हात आजमावून पाहिले पाहिजे, असे सांगितले. यादरम्यान रेहम खान यांनी इम्रान खान यांच्या विधानाचा संदर्भ दिला. ज्यामध्ये इम्रान खान यांनी भारताचे कौतुक केले होते आणि म्हटले की "कोणतीही महासत्ता भारतासाठी अटी घालू शकत नाही".

रेहम खान म्हणाल्या, "इम्रान खान यांना बॉलिवूडमध्ये संधी दिली पाहिजे. त्याच्याकडे विनोदी प्रतिभा चांगली आहे. द कपिल शर्मा शोमध्ये पाजी (नवज्योत सिंग सिद्धू) ची जागा रिक्त आहे, त्यामुळे इम्रान खान त्यांची जागा घेऊ शकतात. त्यांची पाजीशीही चांगली मैत्री आहे आणि आता इम्रान खान यांनी सुद्धा कविता करायला सुरुवात केली आहे."

बॉलीवूडमध्ये नायक की खलनायक?इम्रान खान यांनी बॉलीवूडमध्ये नायकाची भूमिका साकारावी की खलनायकची? या प्रश्नावर रेहम खान म्हणाल्या की, "हे त्यांच्यावर अवलंबून आहे, परंतु मला वाटते की त्यांच्याकडे विनोदी प्रतिभा देखील आहे. कुठे काही झाले नाही तर ते कपिल शर्माच्या शोमध्ये जाऊ शकतो." यानंतर रिपोर्टरने असेही म्हटले की, कपिल शर्मा, मला खात्री आहे की तू रेहमचे ऐकत आहेस.

टॅग्स :Imran Khanइम्रान खानPakistanपाकिस्तान