शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

Imran Khan : जम्मू काश्मीरमधील कलम 370 वरुन मोदींवर टीका, इम्रान खान यांचं अज्ञान उघड

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2021 13:54 IST

Imran Khan : पाकिस्तानी क्रिकेटसंदर्भातही खान यांनी या मुलाखतीत आपले विचार व्यक्त केले. Middle East Eye चॅनेलवर दिलेल्या मुलाखतीत बीसीसीआय ही जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट संघटना असल्याचं त्यांनी म्हटलं.

ठळक मुद्देपंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2017 मध्ये इस्रायलचा दौरा केला होता. त्यानंतर, जवळपास 2 वर्षांनी जम्मू आणि काश्मीरमधून कलम 370 हटविण्यात आले आहे.

नवी दिल्ली - पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पंतप्रधाननरेंद्र मोदींबद्दल केलेल्या विधानावरुन सोशल मीडियावर त्यांना चांगलंच ट्रोल करण्यात येत आहे. आपल्या ज्ञानातून त्यांनी मोदींवर केलेल्या टीकेचा नेटीझन्सने समाचार घेतल्याचं दिसून येते. इम्रान खान यांनी एका मुलाखतीत मोदींबद्दल बोलताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी इस्रायलला गेले, त्यानंतर त्यांनी देशातील कलम 370 हटवले, असे खान यांनी म्हटलं आहे. खान यांच्या या उत्तरामुळे ते ट्रोल होताना दिसत आहेत. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2017 मध्ये इस्रायलचा दौरा केला होता. त्यानंतर, जवळपास 2 वर्षांनी जम्मू आणि काश्मीरमधून कलम 370 हटविण्यात आले आहे. मात्र, पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी दावा करताना, मोदींनी इस्रायलचा दौरा करुन येताच विशेष अधिकार असलेले कलम 370 हटविल्याचे म्हटले आहे. भारत आणि इस्रायलची खास मैत्री असल्याचंही खान यांनी म्हटलं आहे. काश्मीरच्या नावाखाली भारत आणि इस्रायल यांना टार्गेट करण्याचा खान यांचा हेतू स्पष्टपणे दिसत आहे. पण, मुलाखतीतील या उत्तरातून ते आता चांगलेच फसले आहेत.  पाकिस्तानी क्रिकेटसंदर्भातही खान यांनी या मुलाखतीत आपले विचार व्यक्त केले. Middle East Eye चॅनेलवर दिलेल्या मुलाखतीत बीसीसीआय ही जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट संघटना असल्याचं त्यांनी म्हटलं. पाकिस्तानसोबत दौरा रद्द करुन इंग्लंडने स्वत:ची प्रतिमा कमी केली आहे. इंग्लंडला असे वाटते की, पाकिस्तानसारख्या देशांसोबत क्रिकेट खेळून ते या देशावर उपकार करत आहेत. याचं कारण म्हणजे पैसा, कारण पैसाच सध्या सर्वात मोठा खेळाडू बनलाय, अशी भावना त्यांच्यात दिसत असल्याचंही खान यांनी म्हटलं. भारताकडे पैसा आहे, त्यामुळे भारत क्रिकेट विश्वाला नियंत्रित करू शकतो, असे भाकीतच खान यांनी केलं.  

टॅग्स :Imran Khanइम्रान खानprime ministerपंतप्रधानNarendra Modiनरेंद्र मोदीArticle 370कलम 370