शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

RSSची तुलना हिटलरच्या नाझी पक्षाशी; इम्रान खान यांनी तोडले तारे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2019 17:30 IST

RSSच्या हिंदू विचारसरणीची आम्हाला भीती वाटतेय, कारण संघाची विचारसरणी ही नाझींच्या विचारांनी प्रेरित झालेली दिसतेय.

मुझफ्फराबादः भारतातल्या मोदी सरकारनं कलम 370 रद्द करून जम्मू-काश्मीरचं दोन केंद्रशासित प्रदेशात विभाजन केलं. त्यानंतर पाकिस्तान सैरभैर झाला असून, भारताविरोधात आगपाखड करत आहे. पाकिस्तान आंतरराष्ट्रीय पातळीवरही काश्मीरच्या मुद्दा उपस्थित करत दाद मागण्याचा प्रयत्न करत आहे. कलम 370 रद्द करण्यावरून पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान भाजपा आणि आरएसएसवर टीका करत सुटले आहेत. RSSच्या हिंदू विचारसरणीची आम्हाला भीती वाटतेय, कारण संघाची विचारसरणी ही नाझींच्या विचारांनी प्रेरित झालेली दिसतेय.नाझी विचारसरणीप्रमाणे असलेल्या संघाच्या विचारसरणीमुळेच आज काश्मीरचा प्रश्न चिघळला. संघाच्या विचारधारेमुळे भारतातील मुस्लिम उद्ध्वस्त होतील आणि त्यानंतर पाकिस्तानला टार्गेट करण्यात येईल. हा सर्व प्रकार म्हणजे हिटलरच्या विचारांची पुनरावृत्ती आहे. काश्मीरचा नकाशा बदलण्यासाठी जातीय हिंसाचार केला जातोय. ज्या प्रमाणे हिटलरच्या नरसंहारावर जगातले देश गप्प राहिले होते, त्याप्रमाणे भारताच्या या कृतीवरही आज जग गप्प असल्याची टीकाही इम्रान खान यांनी केली आहे.  मोदी सरकारने संविधानातील 370 कलम हटवून जम्मू आणि काश्मीरचा स्वायत्त राज्याचा दर्जा काढून घेतल्यानंतर पाकिस्तान अस्वस्थ झाला आहे. मोदींनी जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारं कलम 370 हटवल्यानंतर पाकिस्तान भारतावर आगपाखड करत सुटला आहे. कलम 370 रद्द करणं ही भारताची घोडचूकच आहे. काश्मीरमधून पर्यटकांना बाहेर हाकलून सैन्य पाठवून भारतानं काय प्राप्त केलं आहे. मोदींनी ही घोडचूक केली आहे.मोदी जो खेळ खेळत आहे, तो पुढे जाऊन भारताला महागात पडणार आहे. काश्मिरी लोकांसोबत मोदींनी विश्वासघात केला आहे. नेहरूंनी काश्मिरी लोकांना त्यांच्या अधिकारांमध्ये कोणीही हस्तक्षेप करणार नसल्याचं आश्वासन दिलं होतं. परंतु मोदी सरकार या उलट कृत्य करत सुटलं आहे. मोदी सरकारला मानवी मूल्य, आंतरराष्ट्रीत पातळीवरचा विरोध, शिमला करार याची काहीही पर्वा नाही. यांची विचारधारा नाझींसारखी झाली आहे. आरएसएसची विचारधाराही नाझींच्या विचारधारेच्या मार्गानं जात असल्याची टीकाही इम्रान खान यांनी केली आहे. 

टॅग्स :Imran Khanइम्रान खानPakistanपाकिस्तानRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ