शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
2
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
3
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
4
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
5
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
6
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
7
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
8
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
9
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
10
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
11
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
12
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
13
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
14
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
15
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
16
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
17
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
18
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
19
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
20
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!

Imran Khan : "गाढव हा गाढवच राहतो"; इम्रान खान स्वत:लाच म्हणाले गाढव; Video जोरदार व्हायरल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2022 17:41 IST

Imran Khan Video : द सेंट्रम मीडिया नावाच्या यूट्यूब चॅनलच्या शो दरम्यान इम्रान खान पाकिस्तान आणि राजकारणावर बोलत होते.

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) विविध मुद्द्यांवरून चर्चेत असतात. आता पुन्हा एकदा त्यांची जोरदार चर्चा रंगली आहे. त्यांचा एक व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. ज्यामध्ये त्यांनी एका कार्यक्रमादरम्यान स्वत:लाच गाढवाची उपमा दिली आहे. "गाढव हा गाढवच राहतो" असं म्हटलं आहे. त्यांच्या या विधानाची सोशल मीडियावर नेटकरीही खिल्ली उडवत असून अनेक मजेशीर मीम्स व्हायरल झाले आहेत. 

द सेंट्रम मीडिया नावाच्या यूट्यूब चॅनलच्या शो दरम्यान इम्रान खानपाकिस्तान आणि राजकारणावर बोलत होते. यावेळी त्यांना पाकिस्तानी लोक देश सोडून का जातात? असा प्रश्न विचारला. त्याला उत्तर देताना इम्रान यांनी स्वतःचे उदाहरण देत सांगितले की, "मी सुद्धा 20-30 वर्षे बाहेर होतो, क्रिकेट खेळायचो पण मला कधीच मी त्यांच्यातला वाटलो नाही, मी त्या समाजाचा एक भाग होतो आणि त्यांनी मला मनापासून स्वीकारले होते. ब्रिटीश समाजात अशा प्रकारे स्वीकारणारे फार कमी लोक आहेत. पण इतकं होऊनही मी ते घर कधीच मानलं नाही, कारण मी पाकिस्तानी होतो"

इम्रान य़ांनी "मला जे हवं होतं तेच मी करत होतो, कारण मला माहिती होते मी इंग्रज होऊ शकत नाही. जर तुम्ही गाढवावर पट्टे ओढले तर गाढवाचा झेब्रा होऊ शकत नाही. गाढव ते गाढवच राहील" असं म्हणत स्वतःची तुलना चक्क गाढवाशी केली. इम्रान खान यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून अनेक जण यावर गंमतीशीर प्रतिक्रिया देत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Imran Khanइम्रान खानPakistanपाकिस्तान