शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

इमरान खान आणि बुशरा बीबीचा निकाह बेकायदेशीर; कोर्टानं सुनावली ७ वर्षांची शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2024 18:01 IST

इमरान खान यांच्याशी लग्न केल्यानंतर बुशरा बीबी यांनी मानेका यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले.

कराची - पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पीटीआयचे संस्थापक इमरान खान यांची बुशरा बीबीसोबतच्याल निकाहला कोर्टानं बेकायदेशीर ठरवलं आहे. या अवैध निकाहामुळे इमरान खान आणि बुशरा बीबी दोघांना ७-७ वर्षाची शिक्षा सुनावली आहे. जेल परिसरात सलग १४ तास सुनावणी घेतल्यानंतर कोर्टाने त्यांचा निर्णय राखून ठेवला होता. 

बुशरा बीबी यांच्यावर आरोप होता की, त्यांनी पहिले पती फरीद मानेका यांना तलाक देणे आणि इमरान खान यांच्याशी दुसरे लग्न करणे यामध्ये आवश्यक कालावधीचे बंधन पाळले नाही.इस्लाम शरियतनुसार, कुठल्याही महिलेला पतीच्या मृत्यूनंतर अथवा मृत्यूच्या काही कालावधीपर्यंत दुसरे लग्न करणे बंदी असते. हा काळ पाळणं इस्लामी कायद्यानुसार आवश्यक असते. त्या काळाला इद्दत असं म्हटलं जाते. हा कालावधी ४ महिने १० दिवस इतका असतो. या काळात परपुरुषासमोर महिला बुरख्यात असते. 

माहितीनुसार, कोर्टाने पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान आणि त्यांच्या पत्नी बुशरा बीबी यांच्या बेकायदेशीर निकाहाला अवैध ठरवत सात-सात वर्षांची शिक्षा सुनावली आहे. त्याचसोबत दोघांना प्रत्येकी ५ लाखांचा दंड ठोठावला आहे. हा निकाल सुनावताना दोघेही कोर्टात हजर होते. यावर्षाच्या सुरुवातीला एका कनिष्ठ न्यायालयाने खान आणि बीबी यांच्या निकाहाला अवैध ठरवले होते. ४९ वर्षीय बुशरा बीबी पंजाबच्या जमिनदार कुटुंबातून येते. त्यांचे पहिले लग्न मानेकासोबत झाले होते. जे जवळपास ३० वर्ष चालले. मानेका पंजाबमधील एक मोठे राजकीय प्रस्थ आहे. 

इमरान खान यांच्याशी लग्न केल्यानंतर बुशरा बीबी यांनी मानेका यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले. बुशरा बीबीच्या पहिल्या पतीने सांगितले की, इमरान खान यांनी बुशरा बीबी यांचे अनुयायी म्हणून घरात एन्ट्री घेतली. त्यानंतर हळू हळू माझे लग्न मोडून २०१८ मध्ये इमरान खान यांनी स्वत: बुशरा बीबीसोबत लग्न केले. इमरान खान यांच्यामुळे आमचा संसार मोडला असा आरोप पहिल्या पतीने केला. १९८९ मध्ये फरीद मानेकासोबत बुशरा बीबीचे लग्न झाले होते. त्यावेळी माझी आणि बुशरा बीबीचं आयुष्य खूप चांगले सुरू होते. जेव्हा इस्लामाबाद येथे राजकीय निर्दशने सुरु होती. तेव्हा इमरान खान अनुयायी म्हणून आला आणि तिथे त्याची पहिली भेट बुशरा बीबीसोबत झाली असं फरीद मानेकाने म्हटलं.  

टॅग्स :Pakistanपाकिस्तानImran Khanइम्रान खान